-
प्रतिनिधी
वांद्र्यात राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये सुरू असणारा संपत्तीचा वाद गुरुवारी रात्री विकोपाला गेला. एका कुटुंबियांनी दुसऱ्या कुटुंबियांच्या घरात घुसून केलेल्या हल्ल्यात एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. (Crime)
(हेही वाचा – Unseasonal Rain : उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी पावसाने घेतला ७३ लोकांचा मृत्यू)
अटक करण्यात आरोपींपैकी एक जण मृताचा नातेवाईक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, मालमत्तेचा वाद हे यामागील कारण होते. इम्रान खान, त्यांची पत्नी कायनात खान, तिचे वडील नासिर खान (६२) आणि तिचा भाऊ फारुख खान अशी या चार आरोपींची ओळख पटली आहे. पोलिसांनी सांगितले की, रात्री ९ वाजताच्या सुमारास दर्गा गल्ली येथे ही घटना घडली. आरोपी शाकीरच्या घराजवळ राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकीर आणि कायनात यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. तिचा पती इम्रान आणि तिचे कुटुंब तिच्या मदतीला धावले. (Crime)
(हेही वाचा – ST Employee Salary : एसटी कर्मचाऱ्यांचे उर्वरित 44 टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत मिळणार)
यादरम्यान हाणामारी झाली आणि इम्रानने शाकीरवर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. या घटनेत इतर तिघे जण जखमी झाले. त्यानंतर शाकीरला मृत घोषित करण्यात आले. वांद्रे पोलिसांना माहिती दिल्यानंतर, हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि साक्षीदारांची चौकशी केली. प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी इम्रान, कायनात, नासिर आणि फारूक यांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, इम्रानचा पूर्वीचा रेकॉर्ड आहे आणि सांताक्रूझ पोलिसांनी त्याच्यावर यापूर्वीही गुन्हा दाखल केला होता. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community