Muslim : धर्मांध मुसलमानांचा गोवर्धन पूजेत हैदोस; हिंदूंच्या घरात घुसून मारहाण

फिर्यादीच्या कुटुंबीयांकडून तक्रार प्राप्त झाली आहे. संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

243
उत्तर प्रदेशात दिवाळीच्या सणात हिंदू धर्मीय गोवर्धन पूजा करत असतात. मुझफ्फरनगर येथेही हिंदू घराघरात ही पूजा करत असताना अचानक मुझफ्फरनगरच्या सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोंधळ उडाला. त्यावेळी धर्मांध मुसलमानांनी (Muslim) थेट हिंदूंच्या घरात घुसून गोवर्धन पूजेत हैदोस घातला. कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. महिलांचा विनयभंग केला. इतकेच नव्हे तर मुसलमान गोवर्धन पूजेवर थुंकले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच भाजपाचे आमदार आणि मंत्री घटनास्थळी पोहोचले. ही घटना उघडकीस येताच भाजपा शहराचे आमदार आणि राज्य सरकारचे मंत्री कपिलदेव अग्रवाल यांनी तातडीने घटनास्थळ गाठून आरोपींना अटक करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले. माहिती मिळताच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारीही तत्काळ पोलीस बंदोबस्तात घटनास्थळी पोहोचले, त्यांनी आरोपी मुसलमान (Muslim) तरुणाला ताब्यात घेतले आणि पीडित कुटुंबांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून प्रकरण शांत केले. फिर्यादीच्या कुटुंबीयांकडून तक्रार प्राप्त झाली आहे. संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमच्याकडे तक्रार करण्यात आली असून हा तपासाचा विषय आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. जी योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.