अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA Action) काही दिवसांपूर्वी १३७ हॉटेल, रेस्टॉरंट्सना नोटिसा बजावल्या होत्या. या नोटिसांमध्ये त्यांना १५ दिवसांत स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याचा इशारा देण्यात आला होता. या नियमांचे पालन न केल्यास तरतुदींनुसार त्यांचे परवाने निलंबित किंवा रद्द करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर आता दोन हॉटेलचे परवानेच एफडीएकडून (FDA) रद्द करण्यात आले आहेत.
लोअर परळमधील प्रसिद्ध चायनीज रेस्टॉरंट ‘मेराक’वर (FDA Action) अन्नसुरक्षा नियमांचे पालन न केल्यानं एफडीएनं कारवाई केली आहे. तसेच, अन्नसुरक्षेच्या संदर्भातील नियमावलीचं पालन करण्यासाठी हॉटेलला दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. या वेळेत दिलेल्या सूचनांचं पालन न झाल्यास एफडीएकडून पुढील कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईतील 18 हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातल्या दोन हॉटेल्सचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी दिली आहे. तसेच या पुढेही अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई सुरू राहणार आहे.
(हेही वाचा – Israel-Hamas War : इस्रायलची वेस्ट बँकमधील मशीद परिसरात मोठी कारवाई; दहशतवादी तळ उद्ध्वस्त)
उच्च श्रेणीतील बहुतेक रेस्टॉरंटमध्ये पेस्ट कंट्रोल रेकॉर्ड, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आणि ऑडिटिंग रेकॉर्ड्स अपडेट (FDA Action) न करण्यासंबंधीचे उल्लंघन आढळून आले, असे एफडीएच्या तपासात धक्कादायक वास्तव्य समोर आले असल्याचे एका अन्न सुरक्षा निरीक्षकाने सांगितले.
मागील दोन महिन्यांत एफडीएने मुंबईतील एकूण १५२ भोजनालयांची (FDA Action) तपासणी केली. त्यापैकी १५ जणांना स्वच्छतेचा अभाव, परवाने नसणे आदी कारणांमुळे त्यांचे कामकाज बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. एफडीएचे सहआयुक्त (अन्न) शैलेश आढाव म्हणाले की, या सर्व तपासण्या नियमित होत्या. मात्र, एफडीए आयुक्त अभिमन्यू काळे यांनी उच्चभ्रू हॉटेलांवर विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या. फूड बिझनेस ऑपरेटर (FBO) सुधारणा सूचनेचे पालन करत नसल्यास त्यांचा परवाना निलंबित केला जाईल. निलंबनानंतर, (FBO) ने कारणे दाखवा नोटीसला समाधानकारक उत्तर न दिल्यास परवाना रद्द केला जाईल, असे आढाव म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community