Bhandara : पोलीस अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल; तरुणीकडे केली शरीरसुखाची मागणी

Bhandara उपविभागीय पोलीस बागुल यांनी या तरुणीला पुन्हा एकटे येण्यास सांगून तक्रार नोंदवून घेण्यासाठी तिच्याकडे शरिरसुखाची मागणी केली आहे.

718
Bhandara : पोलीस अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल; तरुणीकडे केली शरीरसुखाची मागणी
Bhandara : पोलीस अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल; तरुणीकडे केली शरीरसुखाची मागणी

प्रेमप्रकरणात दगा दिलेल्या प्रियकराच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या भंडारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याविरोधात भंडारा (Bhandara) पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. “सद् रक्षणाय खलनिग्रहणाय” हा वाक्य येताच नागरिकांची सुरक्षा करणारे म्हणुन चित्र डोळ्यासमोर येतो. पण हेच रक्षक जर भक्षक बनले, तर नागरिकांची सुरक्षा कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Crime in police)

(हेही वाचा – Modi Cabinet : श्रीकांत शिंदे मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाद; शिवसेनेतून कोण होणार मंत्री?)

प्रियकराविरोधात करायची होती तक्रार

लाखनी तालुक्यातील एक तरुणी प्रियकराविरोधात तक्रार करण्यासाठी भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्याकडे एका महिलेसोबत गेली असता भंडारा उपविभागीय पोलीस बागुल यांनी या तरुणीला पुन्हा एकटे येण्यास सांगितले.

गृह मंत्रालयाला पाठवणार अहवाल

तरुणीला पोलीस अधिकाऱ्याच्या उद्देश न कळल्याने ती पुन्हा तक्रार देण्यासाठी बागुल यांच्याकडे गेली. त्या वेळी त्यांनी तिला तिचे काम करून देण्यासाठी शरीरसुखाची मागणी केली. अखेर तरुणीने याची माहिती सामजिक संघटना यांना दिली. त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मुलीच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्या विरोधात ३५४ अ , ५०९ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात चौकशी सुरु झाली असून हा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवला जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले आहे. (Bhandara)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.