निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आवाजात मशिदीवरील भोंग्याचा (Mosque) आवाज वाढवल्यामुळे उत्तर प्रदेशच्या सीतापूर पोलिसांनी मशिदीतील मौलवी आणि मुतवल्ली यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे. मौलवीचे नाव अब्दुल्ला, तर मुतवल्लीचे नाव बब्बू खान आहे.
#SitapurPolice विभिन्न थानाक्षेत्रों में विगत 15 दिवस में ऊंची आवाज के लाउडस्पीकर के विरुद्ध कार्यवाही में कुल 12 लाउडस्पीकर हटवाये गये एवं 356 की आवाज कम करायी गयी तथा 02 व्यक्तियों के विरुद्ध अभियोग पंजीकृत कर विधिक कार्यवाही की गयी। #UPPolice #QuietZone @Igrangelucknow pic.twitter.com/6sYMaI6yKf
— Sitapur Police (@sitapurpolice) December 4, 2023
पोलीस लाईनशेजारील मशिदीत मोठ्या आवाजात भोंगे वाजवले जात होते
ज्या मशीदमधून लाऊडस्पीकरद्वारे (Mosque) मोठ्या आवाजात अजान देण्यात येत होती ती मशीद पोलिस लाईनजवळ आहे. आवाज कमी करण्यासाठी पोलिसांनी मौलवी आणि मुतवल्लींना अनेक वेळा समजावून सांगितले. पण त्यांना काही फरक पडला नाही. यानंतर रविवारी, ३ डिसेंबर २०२३ रोजी त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. हे प्रकरण सीतापूर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे स्वतः पोलीस आहेत. चौकीचे प्रभारी उपनिरीक्षक अश्मित भारती यांनी त्यांच्याच पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ३ डिसेंबर रोजी ते त्यांच्या परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, पोलीस लाईनशेजारील मशिदीत मोठ्या आवाजात भोंगे वाजवले जात असल्याचे समोर आले. त्यामुळे मशिदीच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चौकी प्रभारींनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई
पोलीस लाईनजवळ बांधलेल्या या मशिदीत (Mosque) सीतापूर येथील रहिवासी दीन मोहम्मद यांचा मुलगा अब्दुल्ला याला मौलवी तर त्याच जिल्ह्यातील रहिवासी सरताज यांचा मुलगा बाबू खान याची मुतवल्ली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपनिरीक्षक अश्मित यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनाही माईकचा आवाज मानकांनुसार ठेवण्यासाठी यापूर्वी अनेकदा समजावून सांगण्यात आले होते. मात्र, त्या दोघांनाही काहीही फरक पडला नाही. अब्दुल्ला आणि बब्बू खान यांची ही कारवाई उत्तर प्रदेश सरकारच्या नियमांचे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन असल्याचे पोलिसांनी मानले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर आयपीसीच्या कलम 188 सोबत ध्वनी प्रदूषण नियमन आणि नियंत्रण नियम 2000 च्या कलम 5/6 नुसार कारवाई केली आहे.
Join Our WhatsApp Community