गाझियाबाद येथील श्री डासनादेवी मंदिराबाहेर दि. ४ ऑक्टोबरच्या रात्री अनेक मुसलमान जमा झाले होते. मंदिरांचे महंत नरसिंहानंद यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ हे मुस्लिम लोक तिथे जमले होते. त्यावेळी त्यांनी मंदिर घुसण्याचा प्रयत्न करत ‘सर तन से जुदा’च्या घोषणाही देण्यात आल्या. पोलिसांनी जमावावर लाठीचार्जही केला. मात्र या मुसलमान लोकांना जमा करण्यामागे अल्ट न्यूजचा सहसंस्थापक महंमद जुबेर (Mohammad Zubair ) असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
( हेही वाचा : Virat Kohli : विराट कोहली, रोहित शर्मा जेव्हा फुटबॉल खेळतात…)
दरम्यान जुबेरवर (Mohammad Zubair) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जुबेरसह अन्य मुसलमानांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी, हिंदू (Hindu) केली आहे. याप्रकरणी स्वत: या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी आणि पीडित असलेल्या भाजपच्या नेत्या डॉ. उदिता त्यागी (Dr. Udita Tyagi) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर पोलिस आयक्तांनी सांगितले की, ‘डासना मंदिरावरील आक्रमण सुनियोजित कट होता. या आक्रमणासाठी मुसलमानांना जमा करण्यामागे महंमद जुबेर(Mohammad Zubair), असदुद्दीन ओवैसी आणि अर्शद मदनी यांनी भडकावले. या आक्रमणात बाहेरून आलेल्या मुसलमानांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community