विलेपार्ले येथील विले ग्रँड रेसिडेन्सी या सोसायटी मधील पूनम बाग या बिल्डिंग मधील बारा मजल्यांच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना शुक्रवारी (१०नोव्हेंबर) रोजी सायंकाळी घडली. यामध्ये एका ९५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Mumbai Fire)
दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २०१ मधील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, टीव्ही, रेफ्रिजरेटर, लाकडी फर्निचर, लाकडी दरवाजे, फॉल्स सिलिंग, घरगुती वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींपर्यंत आग लागली. या आगीची घटना कळताच तात्काळ अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. त्यानांतर लगेचच आग विझविण्यात आली. हर्षदा पाठक असे ९५ वर्षीय महिलेचे नाव आहे.
(हेही वाचा : National Ayurveda Day : प्रत्येक व्याधीला ‘मेडिसिन’ हा पर्याय नाही – वैद्य संतोष जळूकर)
Join Our WhatsApp Community