भिवंडीत गोळीबार; सऱ्हाईत गुन्हेगाराची भर रस्त्यात हत्या

109
ठाणे जिल्हा गोळीबाराच्या घटनांनी हादरून गेला आहे. अंबरनाथ येथे झालेल्या अंदाधुंद गोळीबारानंतर भिवंडीत गोळीबाराची घटना घडली आहे. भिवंडीतील कशेळी येथे दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमानी एका मोटारीवर गोळीबार करून पोबारा केला आहे. या गोळीबारात गणेश कोकाटे हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गणेश कोकाटे हा पूर्वी ठाण्यात राहण्यास होता नुकताच तो भिवंडीतील काल्हेर येथे राहण्यास आला होता. बुधवारी सायंकाळी गणेश हा आपल्या बलोनो या मोटारीतून ठाण्याहून घरी येत असताना भिवंडी कशेळी येथे  दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमापैकी एकाने गणेशच्या मोटारीवर गोळीबार करून पोबारा केला. या गोळीबारात गणेश हा गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी आणि स्थानिकांनी त्याला ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या गोळीबाराप्रकरणी भिवंडी पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, गणेश कोकाटे याच्यावर ठाण्यात काही गुन्हे दाखल असून पूर्ववैमनस्यातून त्याच्यावर हा हल्ला केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.