वांद्रे पश्चिम (Bandra west) येथे उभे राहणारे मुंबईतील अद्ययावत स्वतंत्र पहिले सायबर पोलिस स्टेशन लवकरच कार्यान्वित होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnvis) यांनी शुक्रवारी ( १५ डिसेंबर) विधानसभेत याबाबत घोषणा केली. (Cyber Police Station)
सायबर गुन्हेगारी मध्ये सातत्याने वाढ होत आहे. आणि सामान्य माणसाची मोठ्या प्रमाणात होणारी आर्थिक फसवणूक पाहता मुंबईत स्वतंत्र अद्ययावत सायबर पोलिस स्टेशन असावे अशी संकल्पना वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार अॅड.आशीष शेलार यांनी मांडली. त्याला आवश्यक असणारी शासनाची जागा ही त्यांनी सुचवली. ती मान्य करून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सायबर पोलिस स्टेशन उभारण्यास मंजूरी दिली. त्याचे भूमिपूजन १५ जून २०१९ ला देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. (Cyber Police Station)
(हेही वाचा : RBI ने केली महाराष्ट्रातील ‘या’ पाच बँकांवर कारवाई; जाणून घ्या कारण)
या बहुमजली इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. स्वामी विवेकानंद रोडवर वांद्रे स्टेशन जवळ हे पोलिस स्टेशन उभे राहत आहे. त्यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान असलेले पोलिस स्टेशन, आधिकारी निवास आणि सायबर ट्रेनिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. याच मुद्यावर आशीष शेलार यांनी विधानसभेत हे स्टेशन कधी सुरू करणार याची विचारणा केली.तर हे काम कुठपर्यंत पोहचले आहे याचा आढावा घेऊन लवकरच हे सायबर क्राइम पोलिस स्टेशन (Cyber police station) आणि लॅब सुरू होईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community