Baba Siddique यांच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक, आता आरोपींची संख्या झाली नऊ

133
Baba Siddique यांच्या हत्येसाठी झारखंड राज्यात करण्यात आला होता गोळीबाराचा सराव
  • प्रतिनिधी 

बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतून पाच जणांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. या पाच जणांपैकी एकाने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी हल्लेखोरांना शस्त्र पुरवले होते तसेच हल्लेखोरांना कर्जत येथे आश्रय दिला होती, अशी माहिती पोलिसांनी सूत्रांनी दिली आहे. हे पाच जण बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची योजना बनविणारे शुभु लोणकर आणि मोहम्मद जिशान अख्तर यांच्या संपर्कात होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या ९ झाली असून शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या पाच जणांना सायंकाळी उशिरा किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नितीन सप्रे, संभाजी पारधी, राम कनोजिया, प्रदीप ठोंबरे आणि चेतन पारधी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहे. मुंबई गुन्हे शाखेने या पाच जणांना डोंबिवलीतील कोपर, कर्जत, पनवेल आणि अंबरनाथ येथून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या पाच जणांपैकी नितीन सप्रे आणि राम कनोजिया या हे दोघे मोहम्मद झिशान अख्तर आणि शुभु लोणकर यांच्या संपर्कात होते. नितीन सप्रे आणि राम कनोजिया हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा गुन्हा यासारखे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. (Baba Siddique)

(हेही वाचा – जगदंबिका पाल धमकी प्रकरण; JPC तील विरोधी पक्षांच्या खासदारांवर शिस्तभंगाची कारवाई?)

पाच ही आरोपीची ओळख कल्याणच्या आधारवाडी तुरुंगात ओळख झाली होती. नितीन सप्रे, आणि संभाजी पारधी आणि चेतन पारधी हे एका हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. २०१७ ते २०२२ या कालावधीत आधारवाडी तुरुंगात होते अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येच्या कटात या पाच जणांचा समावेश असून राम कनोजिया याने सिद्दीकी यांच्या हल्लेखोरांना ऑगस्ट महिन्यात खोपोलीतील एका झोपड्यात एक रात्री आसरा दिला होता. नितीन सप्रे याने हल्लेखोरांना शस्त्र पुरवल्याचे माहिती पोलीसानी दिली आहे, ही शस्त्रे उत्तर प्रदेशातून मागविण्यात आली होती. अटक करण्यात आलेले पाचही आरोपी मोहम्मद जिशान अख्तर आणि शुभु लोणकर यांच्या संपर्कात होते. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या पाच जणांना सायंकाळी उशिरा किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते न्यायालयाने २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी यापूर्वी धर्मराज कश्यप, गुरमेल सिंग, प्रवीण लोणकर, हरीश निशाद या चार जणांना अटक करण्यात आली होती. बाबा सिद्दीकींवर (Baba Siddique) हल्ला करणाऱ्या पैकी मुख्य हल्लेखोर शिवकुमार गौतम आणि या कटाचा सूत्रधार शुभु लोणकर आणि मोहम्मद झिशान अख्तर हे तिघे फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. हे तिघे भारताबाहेर पळून गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्याच्या विरुद्ध लूक आउट नोटीस जारी करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.