एपीएसीमधील दाणा मार्केट येथील एका गोदामात भेसळीचे तेल बनवून विक्री केले जात असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तेलात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एपीएमसी येथील दाणा मार्केटमधील गोदामात भेसळीच्या तेलाची विक्री वाढल्याची माहिती मिळाल्यानंतर या गोदामावर धाड टाकली असता पाम तेलाचे अनेक पिंप सापडले. या पाम तेलावर प्रक्रिया करून मागणीप्रमाणे तेल बनवले जाते. मोहरीचे तेल, सूर्यफूल तेल आणि शेंगदाणा तेलावर त्या त्या तेलाच्या वासाचे इसेन्स टाकून पाम तेलावर प्रक्रिया करून खाद्य तेल बनवले जात होते. यावेळी ब्रँडेड खाद्यतेलांवर प्रक्रिया करून हे खाद्य तेल बनवले जात होते. त्यात हे भेसळीचे तेल भरून राज्यभरात अनेक ठिकाणी तसेच गुजरातमध्येही पाठवले जात होते.
(हेही वाचा – MLA Ravindra Waikar : ठाकरे गटातील आमदाराला मोठा धक्का! रवींद्र वायकर यांच्यासह पत्नीवर गुन्हा दाखल )
पोलिसांनी हे गोदाम सील केले असून याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाला माहिती दिली. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन तेलाचे सर्व नमुने ताब्यात घेतले. त्याचा फॉरेन्सिक अहवाल आल्यावर संबंधित व्यक्ती आणि कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community