काँग्रेस प्रवक्ता आलोक शर्मा (Congress spokesperson Alok Sharma) हे नव्या वादात सापडले आहेत. आजतक या हिंदी वृत्तवाहिनीवरील एका डिबेट शोमध्ये चर्चा करताना त्यांनी मराठी समूदायाची तुलना बलात्कारी लोकांसोबत (Alok Sharma Marathi Statement) करणारे वक्तव्य केलं. त्यामुळे आता सर्व स्तरातून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. अपमानास्पद वक्तव्याबद्दल आलोक शर्मा यांच्याविरोधात शिवसेनेने तक्रार केली आहे. (Alok Sharma)
नेमके आलोक शर्मा काय म्हणाले?
आजतक या हिंदी वृत्तवाहिनीवरील एका डिबेट शोमध्ये चर्चा करताना आलोक शर्मा म्हणाले होते, बलात्कारासारख्या (Badlapur School Case) गुन्ह्यांमध्ये सामिल असलेल्या मराठी माणसांचे रक्षण भाजपा (BJP) पक्ष करणार का? बदलापूरमध्ये एखाद्या मराठी व्यक्तीने बलात्कार केला तर त्यावेळीही भाजपा त्यांना पाठीशी घालणार का? असा प्रश्न आलोक शर्मा यांनी उपस्थित केला होता. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. (Alok Sharma)
आलोक शर्मा यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. महाराष्ट्रात राहून मराठी माणसावर अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे निंदनीय असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. भाजपा नेत्यांनी देखील आलोक शर्मा यांच्या या विधानाचा निषेध केला आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी यावर राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.
मराठी माणसाचा बलात्कारी असा उल्लेख करून काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आलोक शर्मा यांनी तमाम मराठी माणसांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. याच वक्तव्याचा निषेध नोंदवत शिवसेनेचे सोशल मीडिया राज्यप्रमुख आणि युवासेनेचे सरचिटणीस मा.श्री. राहुल कनाल यांनी मुंबई पोलिसांकडे केलेल्या… pic.twitter.com/PsTrE2tLTP
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) August 23, 2024
शिवसेनेकडून तक्रार दाखल
मराठी माणसाबद्दल आपत्तीजनक वक्तव्य करणाऱ्या अलोक शर्मा यांच्याविरोधात शिवसेनेने (Shivsena) तक्रार नोंद केली आहे. अलोक शर्मा यांना काँग्रेसने काढून टाकावं, त्यांच्यावर कारवाई करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community