तस्करीच्या धंद्याविरुद्ध महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) मुंबई झोनल युनिट (MZU) या मुंबई विभागीय पथकाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई आणि नवी मुंबईत अनेक ठिकाणी एकाच वेळी झडतीसत्रं राबवले. सिगारेट आणि इतर निषिद्ध वस्तूंच्या तस्करीत गुंतलेल्या जाळ्या (सिंडिकेट) द्वारे या परिसरात कारवाया सुरु होत्या. (Cigarettes Seized)
(हेही वाचा – ४ जूनला भाजपा आणि एनडीएचा विजय निश्चित; Amit Shah यांचा विश्वास)
1962 च्या तरतुदींनुसार अटक
गुप्तचरांकडून मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारावर, डीआरआयने समन्वयित कारवाई करत परदेशी नामचिन्हांकित (ब्रँडेड) सिगारेटच्या 53.64 लाख (53 लाख 64 हजार) कांड्या जप्त केल्या. या कांड्यांची एकूण किंमत 8.04 कोटी रुपये (8 कोटी 4 लाख रुपये) एवढी आहे. या कारवाईत या सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार त्याच्या साथीदारासह पकडला गेला आहे. सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदींनुसार त्यांना अटक झाली असून, सिगारेट तस्करीच्या व्यवहारातील आपला सहभाग, या दोघांनीही कबूल केला आहे.
डीआरआयने भारतातील तस्करीच्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी सातत्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सिगरेट तस्करीचे हे जाळे उद्ध्वस्त करण्याची ही कारवाई म्हणजे, अशा बेकायदेशीर व्यापारात गुंतलेली जाळी नष्ट करण्यासाठी सुरू असलेल्या डीआरआयच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. (Cigarettes Seized)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community