परदेशी ब्रँडच्या २४ कोटी रुपये किंमतीच्या सिगारेट जप्त, पाच जणांना अटक

152
परदेशी ब्रँडच्या २४ कोटी रुपये किंमतीच्या सिगारेट जप्त, पाच जणांना अटक
परदेशी ब्रँडच्या २४ कोटी रुपये किंमतीच्या सिगारेट जप्त, पाच जणांना अटक

मुंबईच्या महसूल गुप्तचर विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. परदेशी ब्रँडच्या २४ कोटी रुपये किंमतीच्या सिगारेट जप्त करण्यात आल्या असून पाच जणांचा अटक करण्यात आली आहे.

नक्की काय घडले?

गुप्तचर विभागाच्या विशिष्ट माहितीच्या आधारे मुंबईच्या महसूल गुप्तचर विभागाने न्हावा शेवा बंदरात अवैध पदार्थांची वाहतूक करणारा एक कंटेनर पकडला. हा कंटेनर पुढील मंजुरीसाठी अर्शिया फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोनमध्ये उतरवला जाणार होता. या कंटेनरच्या हालचालींवर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी बारीक लक्ष ठेवून होते. कंटेनरने बंदर सोडल्यानंतर, गंतव्यस्थानी पोहोचण्याऐवजी तो अर्शिया एफटीडब्ल्यूझेडकडे जात असताना एका खासगी गोदामाकडे वळवण्यात आला होता. आयात करण्यात आलेल्या कंटेनरमधून Esse, Dunhill, Mond आणि Gudang Garam या परदेशी ब्रँडच्या १.०७ कोटी सिगारेटी जप्त करण्यात आल्या. त्याचा पाठपुरावा करताना त्याच टोळीकडून यापूर्वी तस्करी करण्यात आलेल्या Esse Lights, Mond सारख्या विविध परदेशी ब्रँडच्या १३ लाख सिगारेट दुसऱ्या एका गोदामातून जप्त करण्यात आल्या. महसूल गुप्तचर विभागाने जप्त केलेल्या या परदेशी १.२ कोटी सिगारेटचे एकूण बाजार मूल्य सुमारे २४ कोटी रुपये आहे. या कारवाईत आयातदारासह पाच जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा – अकोला दंगलीत एकाचा मृत्यू, १० जण जखमी; सध्यस्थिती काय?)

महसूल गुप्तचर विभाग सातत्याने तस्करी करणाऱ्या टोळीच्या अशा योजना उघडकीस आणत आहे जे सेझ आणि एफटीडब्ल्यूझेड योजनांचा गैरवापर करून प्रतिबंधित मालाची तस्करी करत आहेत. महसूल गुप्तचर विभागाच्या या कारवाईमुळे सरकारी महसुलाचे संरक्षण होत आहे तसेच अवैध तंबाखूच्या हानिकारक परिणामांपासून समाजाचे संरक्षण होत आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.