Drug Case : मुंबई विमानतळावर ४० कोटींच्या कोकेनसह महिलेला अटक

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) एका विदेशी महिलेला ४० कोटीच्या कोकेन या अमली पदार्थसह अटक करण्यात आली आहे.

190
Drug Case : मुंबई विमानतळावर ४० कोटींच्या कोकेनसह महिलेला अटक
Drug Case : मुंबई विमानतळावर ४० कोटींच्या कोकेनसह महिलेला अटक

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) एका विदेशी महिलेला ४० कोटीच्या कोकेन (cocaine) या अमली पदार्थसह अटक करण्यात आली आहे. ही महिला थायलंड देशाची नागरिक असून ती भारतात कोकेन (cocaine) या अमली पदार्थासह अटक करण्यात आली आहे. (Drug Case)

एक महिला मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सह भारतात येत असल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीआयआर (DRI) गुरुवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेवरून येणाऱ्या विमानातील महिला प्रवाशांवर पाळत ठेवली होती. या दरम्यान आदिस अबाबाहुन आलेल्या एका विदेशी महिलेवर अधिकाऱ्यांना संशय येताच तीला अडवून तिच्या जवळील सामानाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत डीआयआरच्या (DRI) अधिकाऱ्यांना एका बॅगेत असलेली पावडर सारख्या पदार्थांची पाकीटे आढळून आली. (Drug Case)

(हेही वाचा – Ind vs Afg 1st T20 : मोहालीच्या थंडीत अक्षर, शुभमन आणि कुलदीपची ‘अशी’ झाली फजिती)

कोकेनची किंमत जवळपास ४० कोटी रुपये

डीआयआरच्या (DRI) अधिकाऱ्यांनी या पाकिटांची तपासणी केली असता त्यात कोकेन हा अमली पदार्थ आढळून आला. डीआयआर (DRI) अधिकाऱ्यांना जवळपास डझनभर कोकेनची पाकीट मिळून आली आहे. याप्रकरणी डीआयआरने (DRI) या महिलेविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून या महिलेला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेली महिला ही मूळची थायलंड या देशाची नागरिक असून ती आदिस अबाबा येथून कोकेनची (cocaine) खेप घेऊन भारतात आली होती, डीआयआरने (DRI) जप्त केलेल्या कोकेनची (cocaine) किंमत जवळपास ४० कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ती भारतात हा कोकेन (cocaine) कोणाला देणार होती याबाबत तपास सुरू असल्याची माहिती डीआयआरच्या (DRI) अधिकाऱ्यांनी दिली. (Drug Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.