-
प्रतिनिधी
खंडणीच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी सत्य प्रतिज्ञापत्रावर बनावट स्वाक्षरी करत सत्र न्यायालयात दाखल करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कृष्णा पेनूरकर या संशियताविरुद्ध ठाणे नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा तसेच बोगस दस्तावेज प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तक्रारदार आकाश गुप्ता हे बांधकाम व्यावसायिक आहे. वरळी आदर्श नगर येथे गुप्ता यांच्या बांधकाम कंपनीतर्फे झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) अंतर्गत अडीज हजार झोपडीधारकाचे पुनर्वसनाचे काम सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी आकाश गुप्ता यांनी नयानगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या १० कोटी रुपयांची खंडणीच्या गुन्ह्यात आदेश बांदेकर यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली होती. (Fraud)
या गुन्ह्याच्या तपासात कृष्णा पेनूरकर यांचे नाव निष्पन्न झाल्यानंतर नया नगर पोलिसांनी पेनूरकर यांना संशयित आरोपी म्हणून घोषित करून त्याचा शोध सुरू होता. संशयित आरोपी कृष्णा पेनूरकर यांनी अटक टाळण्यासाठी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जासोबत पेनूरकर यांनी न्यायालयात नोटरी सत्यप्रतिज्ञापत्र सादर केले होते. दरम्यान १८ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने कृष्णा पेनूरकर यांचा जामीनअर्ज फेटाळून लावत जामीन नामंजूर करण्यात आला होता. (Fraud)
(हेही वाचा – हिंदी कवी-कथाकार Vinod Kumar Shukla यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर; छत्तीसगडमधील लेखकाला पहिल्यांदाच मिळणार हा सन्मान)
खंडणीच्या गुन्ह्यातील तक्रारदार आकाश गुप्ता यांनी संशयित आरोपी कृष्णा पेनूरकर यांनी न्यायालयात दाखल केलेली अटकपूर्व जामीन अर्जाची सत्यप्रत न्यायालयातून मिळवून त्याचे अवलोकन केले. पेनूरकर याने आकाश गुप्ता यांच्या कंपनी सोबत २०२३ मध्ये वरळी आदर्श नगर येथे सुरू असणाऱ्या झोपू योजनेच्या करारनामा करण्यात आला होता. त्या करारनामामध्ये अंगठ्याचे ठसे, स्वाक्षरी आणि बायमेट्रिक तपासणी आणि न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या सत्यप्रतिज्ञा पत्रावरील स्वाक्षरी मध्ये तफावत आढळून आली. (Fraud)
तक्रारदार गुप्ता यांनी या दोन्ही स्वाक्षरी हस्ताक्षर तज्ञ यांच्याकडून तपासून घेतले असता दोन्ही कागदपत्रावरील हस्ताक्षर वेगवेगवेगळ्या व्यक्तीच्या असल्याचे आढळून आले अशी माहिती तक्रारदार अशोक गुप्ता यांनी दिली. कृष्णा पेनूरकर याने स्वाक्षरी आणि अंगठ्याचे खोटे ठसे करून न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी गुप्ता यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल।केला होता. बुधवारी ठाणे नगर पोलिसांनी कृष्णा पेनूरकर विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Fraud)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community