Ajay Maharaj Baraskar यांना मारण्यासाठी आलेल्या चौघांना अटक

बारसकर यांना मराठा आरक्षण बाबत आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका न आवडल्याने त्यांनी समाजमाध्यमांवर मनोज जरांगे-पाटील यांच्या विरोधात त्यांची मते मांडली होती. त्या गोष्टीचा राग मनात धरून मनोज जरांगे-पाटील यांच्या काही समर्थकांनी यापूर्वी बारसकर यांना जिवे मारण्याची धमकी दिलेली होती असे बारसकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

439
Ajay Baraskar Maharaj: कालच्या तमाशामुळे मराठा समाजाची बदनामी झाली, विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या; बारसकर महाराजांचा जरांगेंवर हल्लाबोल
Ajay Baraskar Maharaj: कालच्या तमाशामुळे मराठा समाजाची बदनामी झाली, विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या; बारसकर महाराजांचा जरांगेंवर हल्लाबोल

मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांचे विरोधक अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांना मारण्यासाठी मरीन ड्राईव्ह येथील हॉटेलमध्ये घुसलेल्या चार जणांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली आहे. हे चौघे जरांगे-पाटील यांचे समर्थक असल्याची माहिती समोर येत आहे. विजय कृष्णा देशमुख (४९) विनोद लक्ष्मण पोखरकर (३८), संदीप तनपुरे, गणेश ढोकळे पाटील (५४) असे अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहे. हे सर्व नवी मुंबईतील विविध परिसरात राहणारे आहेत. या चौघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १४३ ,१४९, १२० (बी) सह मपोका कायदा कलम ३७(१)१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) हे मराठा समाजास आरक्षण मिळण्याकरीता काम करीत आहे. २०१६ साली करण्यात आलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चा आंदोलनामध्ये त्यांनी समन्वयक म्हणून भूमिका पार पाडली आहे. (Ajay Maharaj Baraskar)

बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांना मराठा आरक्षण बाबत आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांची भूमिका न आवडल्याने त्यांनी समाजमाध्यमांवर मनोज जरांगे-पाटील यांच्या विरोधात त्यांची मते मांडली होती. त्या गोष्टीचा राग मनात धरून मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या काही समर्थकांनी यापूर्वी बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांना जिवे मारण्याची धमकी दिलेली होती असे बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. बारसकर हे शुक्रवारी दुपारी मुंबईतील चर्चगेट येथील अस्टैरिया हॉटेल तेथे मुक्कामास असताना अटक करण्यात आलेले चौघे हॉटेलवर आले होते. (Ajay Maharaj Baraskar)

(हेही वाचा – Haldwani Violence: हल्द्वानी हिंसाचाराच्या मास्टरमाइंडला अटक, दंगल भडकवून आरोपी लपला दिल्लीत)

हॉटेल कर्मचारी यांनी त्यांना हटकले असता मराठा आरक्षण संदर्भात बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांना भेटायचे आहे असे सांगून बारसकर हे कुठल्या खोलीत थांबले आहे असे विचारून खोलीकडे जाण्यासाठी निघाले असता बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांचे सहकारी सत्यवान शिंदे हे आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या पोलिसांसह तेथे आले असता हे चौघे पोलिसांना बघून पळून जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आणले. बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात या चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली असून या तक्रारीत हे चौघे मला मारण्यासाठी आले होते असे बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांनी तक्रारीत म्हटले आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात या चौघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १४३, १४९, १२० (बी) सह मपोका कायदा कलम ३७(१)१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आली आहे. (Ajay Maharaj Baraskar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.