- प्रतिनिधी
बाबा सिद्दीकी (Baba Siddique) हत्या प्रकरणात आणखी एकाला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणातील ही चौथी अटक आहे. हरिशकुमार बालकराम (२३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेश राज्यातील बेहराईच जिल्ह्याचा रहिवासी आहे, त्याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.
पुण्यात भंगार विक्रेता म्हणून काम करणाऱ्या हरिशकुमार हा बाबा सिद्दीकीच्या हत्येच्या कटाचा एक भाग आहे. हरिशकुमार याने हल्लेखोरांना आर्थिक रसद आणि इतर मदत केल्याचा आरोप त्याच्यावर असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे. (Baba Siddique)
(हेही वाचा – Election Commission : निवडणूक आयोगाकडून ‘ईव्हीएम’बाबत मोठा खुलासा)
बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर वांद्रे पूर्व खेरनगर जंक्शन येथे शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात बाबा सिद्दीकी यांचा आमदार पुत्र झिशान थोडक्यात बचावला, सूत्रांच्या म्हणण्यानुसार झिशान हा देखील हल्लेखोरांचा निशाण्यावर होता, परंतु त्याला एक कॉल आल्यामुळे तो वडील बाबा सिद्दीकी सोबत न जाता मोटारीतून बाहेर पडला. पोलिसांनी तीन हल्लेखोरांपैकी दोघांना घटनास्थळी अटक केली, व तिसरा मुख्य हल्लेखोर शिवकुमार गौतम हा पळून गेला.
बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची हत्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याने केल्याचे समोर आले, हत्येचा हेतू अद्याप समोर आलेला नाही. या हत्येमागे वेगवेगळे पैलू बाहेर येत आहे. मुंबई गुन्हे शाखेने रविवारी पुण्यातून प्रवीण लोणकर याला अटक करण्यात आली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community