- संतोष वाघ
ब्रँडेड शुज आणि चप्पलच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या कुर्ल्यातील बूट बाजारात मुंबई गुन्हे शाखा आणि कॉपी राईट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून सव्वा कोटी रुपयांचे बनावट शूज आणि चप्पल जप्त केले आहे. याप्रकरणी ७ दुकानदारांविरुद्ध कॉपी राईट आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ४ जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर येथील बूट बाजारातील दुकानदारांचे धाबे दणाणले आहे. (Fraud)
कुर्ला पश्चिम रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या पाकिटवाला लेन, अब्दुला मेन्शन हरयावाला लेन या ठिकाणी असलेल्या चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात शूज, चप्पलची दुकाने आहेत. येथील बैठ्या चाळींमध्ये असणाऱ्या या दुकानांमध्ये ब्रँडेड कंपनीच्या नावाखाली शूज चप्पलची विक्री करून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक (Fraud) केली जात आहे. नाईक (Nike) आदिदास (Adidas), पुमा (puma) इत्यादी बड्या कंपन्याचे लेबल असलेले बूट ब्रँडेड म्हणून ग्राहकाच्या माथी मारले जातात. छोटे मोठे डिफेक्ट असून आम्ही थेट कंपन्यांकडून माल घेऊन स्वस्त दरात विकत असल्याचे खोटे ग्राहकांना सांगून पक्के बिल न देता बुटांची विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली जाते. स्वस्त आणि ब्रँडेड शूज मिळत असल्याच्या गैरसमजुतीतुन कॉलेज तरुण तरुणी येथे शूज-चप्पल खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात. (Fraud)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : निवडणुका सुरळीत पार पाडण्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची; डॉ. किरण कुलकर्णी यांचे प्रतिपादन)
१ कोटी २७ लाख ४० हजार रुपयांचे बनावट माल जप्त
कुर्ल्यातील बुट बाजारात ब्रँडेड कंपनीचे नाव वापरून बनावट शूज आणि चप्पलची विक्री करून ग्राहकांची फसवणूक (Fraud) केली जात असल्याची माहिती ‘लॅजिस्ट आयपीआर सर्व्हीस’ या कॉपी राईट कंपनीला मिळाली होती. या कंपनीकडे पुमा, नाईक, आदिदास या कंपन्यांचे स्वामित्व हक्क संरक्षणाचे अधिकार देण्यात आलेले असल्यामुळे या कंपनीने मुंबई गुन्हे शाखेकडे कुर्ल्यातील बुट बाजार विक्री होणाऱ्या बनावट शूज-चप्पल संदर्भात तक्रार दाखल केली होती. दरम्यान कॉपी राईट कंपनीचे अधिकारी आणि गुन्हे शाखा कक्ष ५च्या पोलीस अधिकारी आणि पथकाने दोन दिवसांपूर्वी कुर्ल्यातील या बुट बाजारातील शु एक्सप्रेस, योगेश फुट वेअर, उमेश फुट वेअर, प्रकाश शुज मार्ट, प्रकाश शुज मार्ट, कृष्णा फुट वेअर आणि ए के शुज या ८ दुकानांवर छापे टाकून नाईक (Nike) आदिदास (Adidas), पुमा (puma) या कंपन्यांचे लेबल असलेले बनावट शूज आणि चप्पल असा एकूण १ कोटी २७ लाख ४० हजार रुपयांचे बनावट माल जप्त करण्यात आला आहे. (Fraud)
याप्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात कॉपी राईट कायदा आणि फसवणूक (Fraud) प्रकरणी गुन्हा दाखल करून योगेश छाजीलाला जयस्वाल, किशोर श्रवण आहिरे, प्रशाद नर्सिंगराव चिंदाकिर्दी आणि युवराज सुरेश आहिरे असे अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. या चौघांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. स्थानिक सूत्रांच्या म्हणण्यानुसार मंदिर, लांबपल्ल्याच्या ट्रेन, तसेच उच्चभ्रू वसाहतीमधून ब्रँडेड कंपन्यांचे शूज चप्पल चोरणाऱ्या महिला आणि अल्पवयीन मुलांच्या टोळ्या चोरलेले शूज चप्पल कुर्ल्यातील या बूट बाजारातील दुकानदाराना विकतात, हे दुकानदार चोरीचे शूज-चप्पल यांची साफसफाई करून हे ब्रँडेड शूजची विक्री ग्राहकांच्या मागणीनुसार केली जाते. शूज-चप्पल चोरीला गेल्याची तक्रार शक्यतो पोलीस ठाण्यात दाखल होत नसल्यामुळे पोलिसांकडून कारवाई होत नाही, त्याचा फायदा या टोळ्या आणि विक्रते घेतात अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. याबाबत बुट बाजारातील काही विक्रेत्याची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु संपर्क होऊ शकला नाही. (Fraud)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community