Beware of fraudeant calls : नाताळ,नववर्षानिमित्त फ्री गिफ्टची लिंक आली असेल तर व्हा सावध ;फसवणुकींच्या घटनांमध्ये वाढ

बनावट ॲपपासून सावधान राहाण्याचे सायबर पोलिसांचे आवाहन

313
Beware of fraudeant calls : नाताळ,नववर्षानिमित्त फ्री गिफ्टची लिंक आली असेल तर व्हा सावध ;फसवणुकींच्या घटनांमध्ये वाढ

नाताळ, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सायबर चोरांकडून फ्री गिफ्टचे आमिष दाखवून फसवणुकीच्या घटनांसह फोन पे, पेटीएम, फोन पे, गुगल पे यांसारखे बनावट ॲपद्वारेही हा धंदा सुरू असल्याचे पोलिसानी सांगितले. तर अशा बनावट ॲप पासून सावध राहाण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे. (Beware of fraudeant calls )

गेल्या ११ महिन्यात सायबर संबंधित ३ हजार ८८८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७०७ गुन्ह्यांची उकल करत ९३६ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये सायबर फसवणुकीचे सर्वाधिक दोन हजार ५७ गुन्ह्यांची नोंद आहे. यापैकी अवघ्या २९५ गुन्ह्यांची उकल ४३३ आरोपींनी बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.  (Beware of fraudeant calls )

(हेही वाचा : WFI Election Timeline : ब्रिजभूषण शरण आणि कुस्तीपटूंच्या वादात आतापर्यंत काय काय घडलं?)

फसवणुकींच्या घटनांमध्ये वाढ

त्या सोबतच नाताळ, आणि नववर्षानिमित्ताने सोशल मीडियावर विविध ऑफरर्सही फ्री गिफ्टचे आमिष दाखवून फसवणुकीच्या घटना वाढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अशा कुठल्याही फसव्या अमीषाला बळी न पडता अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. तसेच अशा एखाद्या लिंक वर क्लिक केले असता एखादा व्हायरस तुमच्या मोबईल मध्ये पसरु शकते. त्यामुळे या फसव्या ॲप पासून सावध राहा असे आवाहन करत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.