Gadchiroli : अहेरी दलम कमांडर छत्तीसगड पोलिसांच्या हाती

Gadchiroli : काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने विकास उर्फ सैनू मुन्शी जेट्टी हा छत्तीसगड राज्यातील जगदलपूर कडे जात असताना फरसेगड पोलिसांनी त्याला पकडले.

163
Gadchiroli : अहेरी दलम कमांडर छत्तीसगड पोलिसांच्या हाती
Gadchiroli : अहेरी दलम कमांडर छत्तीसगड पोलिसांच्या हाती

प्रकृती बिघडल्याने उपचाराकरिता छत्तीसगड राज्यातील एका खाजगी रुग्णालयात जात असताना अहेरी दलम कमांडर छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांच्या हाती लागला आहे. विकास उर्फ सैनू मुंशी जेट्टी (४०) असे त्या जहाल नक्षलवाद्याचे नाव आहे.

(हेही वाचा – Sharad Pawar यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली; केंद्राच्या निर्णयाबद्दल घेतली शंका)

मागील काही वर्षापासून गडचिरोली (Gadchiroli) पोलिसांच्या वाढत्या कारवायांमुळे नक्षल चळवळ बॅक फूटवर गेली आहे. अशातच महाराष्ट्र आणि छत्तीसगड (Chhattisgarh) सीमेलगत असलेल्या घनदाट जंगलात आश्रय घेणाऱ्या माओवाद्यांना महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यात बाहेर पडून काम करणे कठीण झाले आहे. काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने विकास उर्फ सैनू मुन्शी जेट्टी हा छत्तीसगड राज्यातील जगदलपूर कडे जात असताना फरसेगड पोलिसांनी त्याला पकडले.

भटपल्ली गावाजवळील नाल्याजवळ अटक

विकास उर्फ सैनू मुन्शी जेट्टी हा भामरागड तालुक्यातील पिडमिली येथील रहिवासी असून तो डिव्हीसीएम पदावर होता. अहेरी दलम कमांडर म्हणून तो या भागात सक्रिय असायचा. मात्र, काही दिवसापासून त्याची प्रकृती बिघडल्याने छत्तीसगड राज्यातील नॅशनल पार्क एरिया कमिटीचा डीव्हीसीएम दिलीप बेंडजा याच्या माध्यमातून एका खाजगी रुग्णालयात जात असताना भटपल्ली गावाजवळील नाल्याजवळ छत्तीसगड पोलिसांनी त्याला अटक केली. त्यावेळी त्याच्याकडे ८० हजार रुपये, नक्षली साहित्य, औषधी देखील मिळाले आहे. छत्तीसगड पोलिसांनी त्याच्यावर उपचार करून अधिक चौकशी केली असता तो अहेरी दलम कमांडर असल्याचे निष्पन्न झाले आहे. (Gadchiroli)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.