गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याची हत्या केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मुख्य आरोपी गणेश मारणे याला अटक केली आहे. मारणे यांच्यासह तिघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. मारणे हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. पुणे पोलीस गुन्हे शाखेने नाशिक रोड येथून अटक केली. शरद मोहेळ हत्याप्रकरणातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह 16 जणांवर मोक्का लावण्यात आला.
(हेही वाचा Gyanvapi : देशभरात गाजलेल्या ज्ञानवापीचा काय आहे इतिहास? )
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) 5 जानेवारी रोजी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली होती. शरद मोहोळ हत्या प्रकरणात 20 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर काही तासांमध्ये सात जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर 15 जानेवारी रोजी पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणात दहा जणांना पनवेल आणि वाशीमधून अटक केली. विठ्ठल शेलार, रामदास उर्फ वाघ्या मारणे यासह दहा जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अटक केली होती.
या हत्येमध्ये आतापर्यंत मुन्ना पोळेकर हा मुख्य आरोपी असल्याचे मानले जात होते. पोळेकरने इतर साथीदारांसोबत या हत्तेचा कट रचल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले होते. मात्र, पोलीस तपासात अनेक गोष्टी समोर आल्यानंतर अनेकजण पोलिसांच्या रडारवर आले आहेत. पुणे पोलिसांनी आज नाशिकमधून या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला गणेश मारणे याला अटक केली आहे.
Join Our WhatsApp Community