रिलायन्स समूहाचे अध्यक्ष उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचे ईमेल पाठवणारा अखेर पोलिसांना मिळून आला आहे. गावदेवी पोलिसांनी तेलंगणा येथून १९ वर्षीय गणेश वनपारधी या तरुणाला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने त्याला ८ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गणेश वनपारधी याने मुकेश अंबानी यांना एक नाही तर पाच वेळा धमकीचे ईमेल पाठवून ४०० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. (Mukesh Ambani)
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष उद्योगपती मुकेश अंबानी यांना २७ ऑक्टोबर रोजी पहिला धमकीचा मेल आला होता. त्यात प्रथम २० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. “जर तुम्ही (अंबानी) आम्हाला २० कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतात सर्वोत्तम नेमबाज आहेत.” असा धमकीचा मेल पाठविण्यात आला होता. एकाच ईमेल आयडीवरून शनिवारी संध्याकाळी दुसरा धमकीचा ईमेल पाठवण्यात आला, ज्यामध्ये २०० कोटींची मागणी करण्यात आली आणि त्यात असे लिहण्यात आले की, “तुम्ही आमच्या ईमेलला प्रतिसाद दिला नाही, आता तुम्ही आम्हाला २०० कोटी रुपये द्याल. जर तुम्ही पैसे दिले नाहीत, तर तुमच्या मृत्यूच्या वॉरंटवर स्वाक्षरी केली जाईल. (Mukesh Ambani)
(हेही वाचा – Costa Serena Cruise : भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय देशांतर्गत क्रूझ प्रवासाला हिरवा झेंडा)
शुक्रवारी रात्री ९ वाजता मुकेश अंबानी यांच्या कार्यकारी सहाय्यकाने अल्टामाऊंट रोडवरील अँटिलिया इमारतीचे सुरक्षा प्रभारी देवेंद्र मुन्शीराम यांना शादाब खानच्या नावाने धमकीचा ई-मेल येत असल्याची माहिती देण्यात आली. दोन मेल पाठोपाठ सोमवारी खंडणीखोराने अंबानींच्या अधिकृत ईमेल आयडीवर तिसरा ईमेल पाठवून ४०० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना मंगळवार आणि बुधवारी असे आणखी दोन ईमेल असे एकूण पाच धमकीचे मेल पाठविण्यात आले होते. (Mukesh Ambani)
गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, हे प्रकरण गंभीरपणे घेण्यात आले होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा मेल बेलजीएम येथून आल्याचे समोर आले होते. परंतु सायबर पोलिसांच्या मदतीने या मेलची माहिती काढण्यात आली, व काही तांत्रिक पद्धतीने या गुन्ह्याचा तपास केला असता मेल पाठवणारा हा तेलंगणा येथून मेल पाठवत असल्याचे समोर आले. गावदेवी पोलिसांचे पथक तेलंगणा येथे रवाना होऊन अखेर गणेश वनपारधी याला अटक करून मुंबईत आणण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. (Mukesh Ambani)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community