श्रीमंत आणि वयोवृद्ध महिलांना कॉल करून त्यांना लग्नाचे अमिष दाखवून ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन मनीपुरी तरुणांना माटुंगा पोलिसानी नोएडा येथून अटक केली आहे. या दोघांनी अनेक वयोवृद्ध महिलांची या प्रकारे फसविल्याची शक्यता वर्तवली जात असून या अनुषंगाने तपास सुरू आहे.
माटुंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या ७५ वर्षीय श्रीमंत महिलेने सहा महिन्यांपूर्वी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, या तक्रारीत तीने तिची १२ लाख ६३ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. पीडित महिलेच्या व्हाट्सअपवर अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला होता, फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख ख्रिस पॉल असे सांगून तो जर्मनीचा राहणारा असल्याचे त्याने पीडित वृद्धेला सांगितले.या व्यक्तीने या महिलेशी गोड बोलून तो तिच्या प्रेमात पडला असल्याचे सांगत तीच्यासोबत लग्न करण्यास तयार असल्याचे सांगून पीडितेचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर त्याने पीडितेला गिफ्ट पाठवले असल्याचे सांगून ते गिफ्ट कस्टम क्लिअरन्ससाठी विमानतळावर अडकले आहे, त्यासाठी साडेतीन लाख रुपये ड्युटी भरण्यास पार पाडले. त्यानंतर त्याने तो लंडन येथून भेटण्यासाठी येत असताना दिल्ली विमानतळावर कस्टम अधिकारी यांनी अडवले आहे, त्याच्याकडे जास्त रोकड असल्यामुळे ते सोडत नाही, असे सांगून पुन्हा तिच्याकडे ८ लाख ७८ हजार नेट बँकिंग मार्फत पाठविण्यास सांगून या वृद्ध पीडित महिलेची १२ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केली.
(हेही वाचा Land Jihad : भाईंदरमध्ये लँड जिहाद; सरकारी जमिनीवर बांधला दर्गा; ‘हिंदू टास्क फोर्स’ने उघडकीस आणले )
माटुंगा पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून बँक खाते आणि मोबाईल क्रमाक टॉवर लोकेशन च्या मदतीने आरोपीची माहिती काढली असता आरोपी हे नोएडा येथे असल्याची माहिती मिळाली. माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.पगार यांचे पथक नोएडा येथे रवाना झाले व स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोन्ही आरोपीना ताब्यात घेतले. थिंगो फेरीय (२६) आणि सोलन अंगथग (२२) या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे डोघे मनीपुरी असून नोएडा येथे स्थायिक झाले आहे. या दोघांनी यापूर्वी याप्रकारे अनेकांची फसवणूक केली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.