Crime News : हातापायाची बोटे मोडून वैद्यकीय प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पोलिसांनी सुरक्षा रक्षकाचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करून वासू ठोंबरे सह चौघांना अटक केली. पोलीस तपासात अटक केलेले तीन आरोपी हे ठोंबरे यांच्याकडे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ग्राहक पाठवून ते प्रत्येक प्रकरणासाठी ४० ते ५० हजार रुपये आकारायचे अशी माहिती तपासात समोर आली.

546
Crime News : हातापायाची बोटे मोडून वैद्यकीय प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Crime News : हातापायाची बोटे मोडून वैद्यकीय प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नुकताच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून घेण्यासाठी रुग्णालय कर्मचाऱ्याच्या मदतीने करंगळी मोडून डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तेथील डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. ही टोळी प्रत्येक वैद्यकीय प्रमाणपत्रांचे ४० ते ५० हजार रुपये घेत होते अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. (Crime News)

वासु ठोंबरे, बाबू निसार सय्यद, समीर इश्तियाक हुसेन आणि अब्दुल हमीद खान असे अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. वासू ठोंबरे हा मुख्य आरोपी असून रुग्णालयात कर्मचारी आहे. वासू ठोंबरे शताब्दी रुग्णालयात हे रॅकेट चालवत होता, त्याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीला प्रमाणपत्र कशासाठी हवे आहे, हे जाणून त्या पद्धतीने त्या व्यक्तीवर उपचार करून तो प्रमाणपत्र देत असे, जर कोणाला खोट्या गुन्ह्यात अडकावयाचे असेल, तर त्याला गंभीर दुखापत दाखविण्यासाठी वासू ठोंबरे हा त्याच्याकडे येणाऱ्या ग्राहकाच्या करंगळीला भूल देण्याचे इंजेक्शन देत असे, त्यानंतर करंगळी सुन्न झाल्यावर ती मोडून रुग्णालयात उपस्थित डॉक्टरकडे पाठवून उपचार घेण्यास सांगून डॉक्टरांकडून गंभीर दुखापतीचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून देत. (Crime News)

(हेही वाचा – Maratha Reservation : भूजबळांच्या भूमिकेशी सरकार सहमत नाही; एनसीपीचे नेतेही सहमत नाहीत – संजय गायकवाड)

असा आला प्रकार उघडकीस 

असाच काहीसा प्रकार कांदिवली येथे घडला, कांदिवली येथे सुरु असणाऱ्या एका एसआरए बांधकामाच्या ठिकाणी बांधकाम व्यवसायिक आणि काही चाळकऱ्यांमध्ये बांधकामाला घेऊन वाद सुरू आहे. रवी बिल्डर साईट एकता नगर कांदिवली पश्चिम मुंबई या ठिकाणी सोसायटी व बिल्डर यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादातुन बांधकामाला विरोध करणाऱ्या विरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्यासाठी एकता सोसायटीचे मेंबर शिवबहद्दूर यादव याच्या सांगण्यावरून सिक्युरिटी एजन्सीचे मालक आणि मॅनेजर अब्दुल हमीद खान याने सिक्युरिटी एजन्सीमधील एका सुरक्षा रक्षकाला शताब्दी रुग्णालयात पाठवले. त्या ठिकाणी बाबुभाई, वासू आणि दोन अनोळखी इसम यांना भेटल्यानंतर वासू ठोंबरे याने सुरक्षा रक्षकाच्या हाताच्या करंगळीमध्ये कसले तरी इंजेक्शन देऊन त्यांची करंगळी सुन्न केली. त्यानंतर ती मोडून नंतर त्यांना रुग्णालयात डॉक्टरांकडे नेऊन त्यांना मारहाण न केलेल्या तीन इसमांची नावे सांगून त्यांनी त्यांना मारहाण केल्याचे खोटे सांगितले. (Crime News)

उपस्थित डॉक्टरांनी सुरक्षा रक्षकांची मोडलेली करंगळी तपासली असता त्यांना करंगळीवर सुई टोचल्याचे ताजे निशाण दिसून आले, डॉक्टरने त्याची चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे डॉक्टरांना संशय आला व त्यांनी तत्काळ हा प्रकार कांदिवली पोलिसांच्या लक्षात आणून दिला. पोलिसांनी फैजान खान याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या चौकशीत धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी सुरक्षा रक्षकाचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करून वासू ठोंबरे सह चौघांना अटक केली. पोलीस तपासात अटक केलेले तीन आरोपी हे ठोंबरे यांच्याकडे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ग्राहक पाठवून ते प्रत्येक प्रकरणासाठी ४० ते ५० हजार रुपये आकारायचे अशी माहिती तपासात समोर आली. भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३२८ (विषाद्वारे दुखापत करणे) आणि १२०-बी (षडयंत्र) अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली, न्यायालयाने त्यांना १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Crime News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.