मुंबई बेंगलोर महामार्गावर (Mumbai Bangalore Highway) नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीकडून हिंजवडी पोलिसांनी बळजबरी चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत.
रामदास बबन कचरे असे या टोळीच्या मोहरक्याच नाव आहे. रामदास बबन कचरे हा आपल्या दोन अल्पवयीन साथीदारांसोबत महामार्गावर लोकांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांचे किंमती सामान बळजबरीपूर्वक चोरी करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
(हेही वाचा – सोन्याच्या तस्करीसाठी परदेशी महिलांचा वापर; मुंबई विमानतळावर १८ सुदानी महिलांना १६ किलो सोन्यासह अटक)
या प्रकरणात तांत्रिक तपास करून हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये रामदास बबन कचरे आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदाराविरोधात भादवि कलम ३९४, ३४ आणि मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून चार दुचाकी, दोन मोबाईल फोन, एक सोन्याची चैन, एक लोखंडी कोयता असा एकूण एक लाख १८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community