मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) (CSMT) परिसरात एका २९ वर्षीय महिलेवर दोन अज्ञातांनी सामूहिक अत्याचार (Gang Rape in Mumbai) केल्याची घटना घडली आहे. ही घटना 22 सप्टेंबरच्या रात्री घडली जेव्हा पीडिता सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर एकटी उभी होती. त्यावेळी आरोपी त्या महिलेबरोबर बोलण्याचा प्रयत्न करायला लागला. त्यानंतर ती महिला आरडा-ओरड करेल या अनुशंगाने तिचे एकाने तोंड धरले.
(हेही वाचा-Mantralaya : आदिवासी आमदार आक्रमक! मंत्रायालयाच्या तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारत केलं आंदोलन; नेमकं कारण काय ?)
पीडितेच्या तक्रारीनुसार, एका आरोपीने तिला आरडाओरड करण्यापासून रोखण्यासाठी तिचे तोंड बंद केले आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या टॅक्सी स्टँडच्या मागे दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ती महिला पळून जाण्यात यशस्वी झाली आणि त्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. (Gang Rape in Mumbai)
(हेही वाचा-“दिनेश गुंडूराव यांनी माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात…”, Naresh Mhaske यांचा इशारा)
या प्रकरणी सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील तपासासाठी माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिस अधिकारी सध्या पुरावे गोळा करून गुन्ह्यात सहभागी असलेल्या संशयितांची ओळख पटविण्याचे काम करत आहेत. (Gang Rape in Mumbai)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community