Gang Rape in Mumbai : सामूहिक बलात्काराचा बनाव रचणारी महिला सापडली

324
Gang Rape in Mumbai : सामूहिक बलात्काराचा बनाव रचणारी महिला सापडली
  • प्रतिनिधी 

मुंबई सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील टॅक्सी स्टॅण्ड या ठिकाणी २ ऑक्टोबर रोजी झालेल्या कथित सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यातील पीडित महिलेने अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे पोलिसांसमोर कबूल केले आहे. सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून हा गुन्हा माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला होता. माता रमाबाई आंबेडकर मार्ग (एमआरए मार्ग) पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. मात्र पोलिसांसमोर एक मोठी अडचण निर्माण झाली होती, या गुन्ह्यातील पीडित महिलेला ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते तेथून ती पीडित महिला गुढरित्या बेपत्ता झाली होती. (Gang Rape in Mumbai)

(हेही वाचा – Gang Rape in Mumbai: टॅक्सीच्यामागे तोंड दाबून CSMT परिसरात महिलेवर सामुहिक बलात्कार!)

महिलेचा पत्ता किंवा संपर्क क्रमांक एफआयआरमध्ये नसल्यामुळे तिचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांकडून शोध घेत असताना ही महिला कुर्ला पश्चिम येथे मिळून आली होती. तिच्या चौकशीत तिच्यासोबत बलात्काराची घटना घडलीच नसल्याचे समोर आले. सीएसएमटी रेल्वे टर्मिनस येथील टॅक्सी स्टॅण्ड जवळ २ ऑक्टोबर रोजी एका महिलेवर दोन जणांनी बलात्कार केल्याची तक्रार खुद्द पीडित महिलेने सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात केली होती. रेल्वे पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून दोन अज्ञात व्यक्तींवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पीडित महिलेला दादर पूर्व येथील महिलांसाठी काम करणाऱ्या एका एनजीओच्या ताब्यात दिले होते. दुसऱ्या दिवशी रेल्वे पोलिसांनी हा गुन्हा मुंबई पोलिसांच्या एमआरए मार्ग पोलीस ठाण्याकडे पुढील तपासासाठी वर्ग केला होता. (Gang Rape in Mumbai)

(हेही वाचा – ‘आप’ ला धडा शिकविण्यासाठी Congress दिल्लीत काढणार यात्रा)

एमआरए मार्ग पोलिसांनी प्रथम पीडित महिलेचा शोध घेण्यासाठी दादर येथील महिलांसाठी काम करणाऱ्या एनजीओकडे चौकशी केली असता पीडित महिला तेथून पळून गेल्याचे समजले. गुन्ह्यातील फिर्यादी आणि पीडित असलेली २८ वर्षीय महिला पळून गेल्यामुळे पोलिसांना तिचा शोध घेणे अवघड झाले होते. तांत्रिक बाबींचा आधार घेऊन पोलिसांनी या महिलेला शोधून काढले. ही महिला फुटपाथवर राहणारी असून ती कुर्ला येथे मिळून आली. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला, त्यात तिने या घटनेचा पूर्णपणे इन्कार केला आहे. अधिकाऱ्यांनी एका एनजीओच्या उपस्थितीत तिचा जबाब नोंदवला आणि त्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १८३ अन्वये मॅजिस्ट्रेटसमोर तिची साक्ष नोंदवण्याचा निर्णय घेतला. (Gang Rape in Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.