कुख्यात गँगस्टर डी.के.राव याला मुंबईतील गुन्हे शाखेच्या (Crime Branch Mumbai) खंडणीविरोधी पथकाने अटक केली आङे. खंडणीविरोधी कक्षाला एका हॉटेल व्यावसायिकाकडून तक्रार मिळाली की, कुख्यात गॅंगस्टर डी.के. राव आणि इतर सहा जणांनी त्यांचे हॉटेल ताब्यात घेण्याचा कट रचला, तसेच खंडणी म्हणून २.५ कोटी रुपयांची मागणी केली आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. (DK Rao Arrested)
(हेही वाचा – Waqf Amendment Bill 2024 : सर्व धर्मांच्या धार्मिक मालमत्तांच्या बंदोबस्तासाठी एकच कायदा करा; विंहिपची मागणी)
यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचून गॅंगस्टर डी.के.राव आणि त्याचे सहा साथीदार यांना अटक केली आहे. भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
खंडणी, फसवणूक आणि फॉर्जरी प्रकरणी डी.के. राव आणि साथीदारांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. डी.के. राव हे कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा (Underworld Don Chhota Rajan) हस्तक होता. त्याला २३ जानेवारी रोजी न्यायालयात उपस्थित केले जाणार आहे. (DK Rao Arrested)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community