Gangster Satish Kalia वर गुन्हा दाखल; पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर व्यावसायिकाकडे मागितली खंडणी

42
Gangster Satish Kalia वर गुन्हा दाखल; पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर व्यावसायिकाकडे मागितली खंडणी
  • प्रतिनिधी

पत्रकार जे. डे. हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कुख्यात गँगस्टर छोटा राजन टोळीचा शार्पशूटर रोहित थंगप्पन जोसेफ उर्फ ​​सतीश कालिया (Gangster Satish Kalia) याच्याविरुद्ध १० कोटी रुपयांची खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालियाने पॅरोलवर बाहेर असताना एका बांधकाम व्यावसायिकाकडे १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. दरम्यान मुंबई खंडणी विरोधी पथकाने या प्रकरणात पाच जणांना बुधवारी अटक केली आहे.

(हेही वाचा – RBI Gold Recovery : रिझर्व्ह बँकेनं लंडन बँकेत ठेवलेलं १०२ टन सोनं आणलं भारतात )

गणेश राम शोराडी उर्फ दादा (६८), प्रदीप फुलचंद यादव, वय (४०) मनिष रामप्रकाश भारद्वाज (४४), रेमी किटू फर्नाडीस (५८) शशिकांत रामदेव यादव (४३) असे अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. अटक आरोपी हे छोटा राजन टोळीचा शार्पशूटर सतीश कालिया (Gangster Satish Kalia) याच्या संपर्कात होते. सतीश कालिया हा २०११मध्ये झालेल्या जे.डे हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे, त्यानेच जे डे यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्याकांडात कालियाला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, कालिया हा पॅरोल वर बाहेर पडल्यानंतर त्याने बांधकाम व्यवसायीक व त्यांचे भागीदार यांना छोटा राजन टोळीचे सदस्यांकडून वारंवार १० कोटी रुपयांची प्रोटेक्शन मनी म्हणुन खंडणी स्वरुपात मागणी करुन धमकावीत होते म्हणुन बांधकाम व्यवसायीक व त्याचे भागीदार यांनी घाबरुन ५५ लाख रूपये प्रोटेक्शन मनी म्हणुन दिले तरी देखील उर्वरीत खंडणीची रक्कम मिळण्याकरीता प्रत्यक्ष व फोनद्वारे बांधकाम व्यवसायीक व त्यांचे भागीदार यांना धमकी देत असल्याचा तक्रार अर्ज खंडणी विरोधी कक्षास प्राप्त झाला होता.

(हेही वाचा – Maharashtra Asembly 2024 : सदा सरवणकरांना मिळाली ऑफर? निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दिले ‘हे’ आश्वासन)

छोटा राजन टोळीतील सदस्य गणेश राम शोराडी उर्फ डॅनी उर्फ दादा, रेमी फर्नाडीस, प्रदिप यादव, मनिष भारव्दाज व शशी यादव यांनी उर्वरीत रक्कमेतील ०५ लाख रुपये खंडणीची रक्कम मागणी केली होती. त्याप्रमाणे बांधकाम व्यावयायिकाचे भागीदार हे खंडणीची रक्कम घेऊन मागणी केल्याप्रमाणे देण्याकरीता स्टारबक्स् कॅफे, लिलावती हॉस्पिटल जवळ, बांद्रा, मुंबई या ठिकाणी गेले असता खंडणी विरोधी पथकाकडून सापळा लावून आरोपीतांना रंगेहात पकडण्यात आले. सदरबाबत बांधकाम व्यावसायिक यांच्या भागीदारांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बांद्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पाच ही आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे. आरोपी गणेश राम शोराडी उर्फ दादा याचे विरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, अवैध अग्नीशस्त्र बाळगून त्याचा वापर करणे याबाबत चार गुन्हे दाखल आहेत. पॅरोल संपल्यानंतर तुरुंगात परतलेल्या कालियाला (Gangster Satish Kalia) गुन्हे शाखा ताब्यात घेण्याची मागणी करणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.