- प्रतिनिधी
मुंबई शहरातील गणेश विसर्जन (Ganpati Visarjan) सोहळा बुधवारी सकाळी निर्विघ्नपणे पार पडला असला तरी विसर्जन मिरवणुकी दरम्यान चोरट्यांनी ‘हाथ की सफाई’ केली आहे. मुंबईतील लालबाग आणि गिरगाव येथे गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान मोबाईल फोन आणि २२ सोन्याच्या चेन चोरीला गेल्याच्या तक्रारी काळाचौकी, व्ही.पी. रोड आणि डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत.
ही आकडेवारी बुधवार दुपारपर्यंत आलेल्या तक्रारीवरून देण्यात आली आहे. दरम्यान दादर चौपाटी जुहू चौपाटी येथे मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन गहाळ झाल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या असून त्यांची आकडेवारी पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. दरम्यान गिरगाव चौपाटीवर विसर्जन (Ganpati Visarjan) सोहळा दरम्यान कुटुंबापासून दुरावलेल्या ३८ लहान मुले आणि १९ मोठी माणसे यांच्या कुटुंबाचा शोध घेऊन ताब्यात देण्यात आले आहे.
(हेही वाचा – राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर बंदी घाला; Chandrashekhar Bawankule यांची मागणी)
मुंबईत मंगळवारी गणेश विसर्जन (Ganpati Visarjan) मिरवणुकीत लाखोंच्या संख्येने गणेशभक्त सामील झाले होते. लालबाग, परळ, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी आणि जुहू चौपाटी परिसर मंगळवारी भक्तिमय झाला होता. मोठ्या प्रमाणात मिरवणुकामध्ये लोकांनी गर्दी केली होती. लाखोंच्या संख्येने असणाऱ्या या मिरवणुकांमध्ये चोऱ्या करणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणात सामील झालेल्या होत्या. मिरवणुकी दरम्यान लालबाग परिसरातून ६४ मोबाईल फोन आणि २२ सोन्याच्या चेन चोरीला गेल्याच्या तक्रारी काळाचौकी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या असून काळाचौकी पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये दोन जण दिल्ली येथून आले होते तर एक जण उत्तर प्रदेश येथून चोरी करण्यासाठी मुंबईत आले होते. उर्वरित पाच जण ठाणे जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान गिरगाव चौपाटी येथे ९९ मोबाईल फोन चोरीला गेले असून याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झालेल्या आहेत. तसेच गिरगाव येथून चौपाटीकडे निघालेल्या गणेश विसर्जन (Ganpati Visarjan) मिरवणूक दरम्यान ८९ मोबाईल फोन चोरीला गेल्याच्या तक्रारी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या आहेत. तसेच दादर आणि जुहू चौपाटी येथे मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन चोरीला गेल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. परंतु, स्थानिक पोलिसांकडून आकडेवारी देण्यात आलेली नाही. गिरगाव चौपाटी येथे विसर्जन दरम्यान गर्दीमध्ये पोलिसांना हरवलेले ३८ लहान मुले तसेच १९ मोठी माणसे मिळून आली होती. पोलिसांनी या सर्वांच्या कुटुंबांचा शोध घेऊन मुलांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community