Terrorist Attack : लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतात दहशतवादी हल्ला करण्याची घोरीची धमकी; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

गतवर्षी दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने उद्ध्वस्त केलेल्या इस्लामिक स्टेटस्च्या राजधानीतील टोळीचा म्होरक्याही घोरीच होता.

420

लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतात मोठा हिंसाचार घडविण्याचा दहशतवादी कट (Terrorist Attack) उघडकीला आला आहे. दहशतवादी फरहतुल्लाह घोरीचा एक व्हिडीओही ‘आयएसआय’ने जारी केला आहे. भारताविरुद्ध आम्ही लवकरच एक मोठे युद्ध सुरू करणार आहोत, असा इशारा घोरी हा या व्हिडीओतून देत आहे.

घोरी हा लष्कर-ए-तोयबा, इस्लामिक स्टेटस् आणि जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे. मूळ हैदराबादचा रहिवासी असलेला फरहतुल्लाह घोरी हा सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील मुस्लिमांचे विशेषतः मुस्लिम युवकांचे सातत्याने ब्रेनवॉशिंग करत असतो. गुप्तवार्ता विषयातील तज्ज्ञांच्या मते, लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतातील धार्मिक सलोख्याला धक्का पोहोचविण्याचा घोरीचा मनसुबा आहे. गतवर्षी दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने उद्ध्वस्त केलेल्या इस्लामिक स्टेटस्च्या राजधानीतील टोळीचा म्होरक्याही घोरीच होता. घोरी या टोळीच्या माध्यमातून इस्लामिक स्टेटससाठी दहशतवाद्यांच्या भरतीचे काम करत असे.

(हेही वाचा One Nation One Election : सरकार पडले, मध्यावधी निवडणुका झाल्या तर…; काय आहेत अहवालातील ठळक वैशिष्ट्ये?)

घोरीने आजवर भारतात घडविलेले दहशतवादी हल्ले (Terrorist Attack) 

  • फरहतुल्लाह बोरीने भारतात अनेक दहशतवादी हल्ले (Terrorist Attack) घडविलेले आहेत.
  • घोरीने २४ सप्टेंबर २००२ रोजी घडवलेल्या अक्षरधाम मंदिरावरील हल्ल्यात ३ कमांडो, राज्य राखीव पोलिस दलाच्या एका जवानासह ३२ हिंदू भाविकांचा मृत्यू झाला होता.
  • हैदराबाद पोलिसांच्या वाँटेड लिस्टमध्ये आहे.
  • घोरीने हैदराबादेत ‘एसटीएफ’च्या कार्यालयात आत्मघातकी दहशतवादी हल्ला घडवून आणला होता.
  • हैदराबादेतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयासह अनेक नेत्यांवर दहशतवादी हल्ले केले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.