Goa : धर्मांतर केल्याच्या आरोपाखाली पाद्री डॉमिनिक डिसोझा याला अटक

255

गोवा (Goa) पोलिसांनी सोमवारी, १ जानेवारी रोजी पहाटे ख्रिस्ती पाद्री डॉमिनिक डिसोझा याने काळी जादू करत प्रलोभने दाखवत ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केल्याप्रकरणी त्याला अटक केली आहे. उत्तर गोव्यातील सोडियम गावातील फाइव्ह पिलर चर्चमध्ये पाद्री डॉमिनिक डिसोझा कार्यरत असतो. एका हिंदू व्यक्तीच्या तक्रारीनंतर पाद्र्याला अटक करण्यात आली आहे.

पाद्री डिसोझा याच्यावर एकूण आठ गुन्हे दाखल

तक्रारीची दखल घेत पोलिसांनी पाद्री डिसोझा याला धर्मांतरण आणि काळी जादू केल्याच्या आरोपाखाली अटक केली. याच कलमांतर्गत (धर्मांतर) त्याच्यावर दाखल झालेला हा तिसरा गुन्हा असून वेगवेगळ्या कलमांतर्गत आणखी पाच गुन्हे यापूर्वीच दाखल आहेत. अशा प्रकारे पाद्री डिसोझा याच्यावर एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. तसेच, त्याची पत्नी जोन मस्करेन्हास आणि फाइव्ह पिलर चर्चशी संबंधित अज्ञात सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबर 2022 मध्ये, उत्तर गोव्याच्या (Goa) जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पास्टर डॉमिनिक डिसोझा याच्या धार्मिक कार्यांवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. निखिल शेट्टी आणि प्रकाश खोबरेकर यांच्या दोन लेखी तक्रारींनंतर 27 मे 2022 रोजी डॉमिनिक डिसोझा याला अटक करण्यात आली होती. 2022 मध्ये त्याच्यावर दाखल झालेला गुन्हा नंतर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.

(हेही वाचा Ayodhya Shri Ram Mandir : रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा ६१ देशांमध्ये दिसणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.