नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीचा (Gold Smuggling) प्रकार उजेडात आला आहे. विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल म्हणजेच शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी पहाटे परदेशातून आलेल्या एका प्रवाशाकडून २ कोटी रुपयांचे सोने हस्तगत केले. गेल्या १० दिवसातील तस्करीची ही दुसरी घटना आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोहम्मद अहमद (Gold Smuggling) नावाच्या एका तस्कराला अटक केली. हा प्रवासी शारजाहून एअर अरेबियाच्या फ्लाइट क्रमांक जी ९-४१५ ने पहाटे ४ वाजून १० मिनीटांनी नागपुरात उतरला. सीमाशुल्क अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्याच्याकडील वस्तूंची स्कॅनरने तपासणी केली. त्यानंतर “कॉफी मेकर मशीन” उघडले त्यामध्ये प्रत्येकी १७४८ ग्रॅम वजनाचे दोन दंडगोलाकार आकाराचे सोने (Gold Smuggling) आढळले.
(हेही वाचा – Asian Games 2023 : कौतुकास्पद! रुतुजा भोसले आणि रोहन बोपन्ना यांची टेनिसमध्ये ‘सुवर्ण’ कामगिरी)
मोहम्मद अहमद हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. त्याने “कॉफी मेकर मशीन”मध्ये सोने लपवून (Gold Smuggling) आले होते. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. या कारवाईचे नेतृत्व आयुक्त अविनाश थेटे आणि अतिरिक्त आयुक्त यांनी केले. एअर कस्टम्स यूनिट आणि नागपूर कस्टम्सचे एअर इंटेलिजन्स युनिट यांच्यासह सहाय्यक आयुक्त लक्ष्मीनारायण, अधीक्षक त्रिदीप पाल, प्रकाश कापसे, राजेश खापरे; निरीक्षक आदित्य बैरवा, प्रियंका मीना आणि हवालदार चंदू धांडे, अनुराग परिहार यांनी सोन्याच्या तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला.
नागपूर विमानतळावर सोन्याची तस्करीची (Gold Smuggling) गेल्या १० दिवसांतील दुसरी घटना आहे. यापूर्वी १९ सप्टेंबर रोजी कतारहून आलेल्या २ तरुणांना सीमाशुल्क विभागाने २ किलोहून अधिक सोन्यासह पकडले होते. त्याची किंमत एक कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. दोघांनी हे सोने (Gold Smuggling) आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून पेस्ट स्वरूपात आणले होते. त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मो. शाहीद नालबंद (३३) हा हुबळी कर्नाटकचा रहिवासी असून पीरबाबा कलंदर बाबूसा सौदागर (३८) हा हंगल कर्नाटकचा रहिवासी आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community