Gold Smuggling : दिव्यांग प्रवाशाच्या बुटात सापडले कोट्यवधींचे सोने

98
Gold Smuggling : दिव्यांग प्रवाशाच्या बुटात सापडले कोट्यवधींचे सोने
  • प्रतिनिधी 

बँकॉक येथून व्हीलचेअर वरून आलेल्या एका ज्येष्ठ नागरिक असलेल्या दिव्यांग व्यक्तीच्या बुटात कोट्यवधी रुपयांचे सोने सापडले आहे. डीआयआरच्या मुंबई विभागाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई केली असून सोन्यासह दिव्यांग व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेले सोने तस्करी करून मुंबईत आणण्यात आले होते. यामागे मोठे सोने तस्करीचे सिंडिकेट काम करीत असल्याची शक्यता डीआयआरच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. भरत चमनलाल शेठ (७१) असे डीआयआरने कारवाई केलेल्या दिव्यांगाचे नाव आहे. (Gold Smuggling)

(हेही वाचा – सुधारित वक्फ कायद्यामुळे गरिबांची होणारी लूट थांबेल; पंतप्रधान Narendra Modi यांचे विधान)

भरत सेठ हे मुंबईतील शिवडी येथे राहणारे असून त्यांचा उजवा पाय कापला गेल्यामुळे ते व्हीलचेअरचा वापर करतात. उजव्या पायात त्यांनी जयपूर फूट बसवलेला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई युनिटने विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे कारवाई करताना, डीआरआय अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी थाई एअरवेजच्या विमानाने बँकॉकहून भारतात आगमन झालेले शिवडी येथील रहिवासी भरत चमनलाल शेठ यांना अटक केली. (Gold Smuggling)

(हेही वाचा – शिवसेना उबाठाला सत्तेत यायचंय, पण…; Chandrakant Patil यांचा दावा)

उजवा पाय कापल्यामुळे व्हीलचेअर वापरणाऱ्या शेठने त्याच्या बुटाच्या तळव्यात एकूण ६,७३५.४२ ग्रॅम वजनाचे १४ सोन्याचे बार लपवले होते. कस्टम कायद्याअंतर्गत चौकशीदरम्यान, शेठने कस्टम अधिकाऱ्यांना न सांगता सोने तस्करी केल्याची कबुली दिली. त्याने ३६ वर्षीय मुंबई रहिवासी चिंतन संघवी याला त्याचा साथीदार असल्याची माहिती दिली. जप्त करण्यात आलेले सोन्याची किंमत साडे सहा कोटींच्या घरात आहे. दरम्यान डीआयआर ने परळ येथून चिंतन संघवी याला अटक केली, यामागे मोठे सिंडिकेट असल्याची शक्यता डीआयआरच्या अधिकारी यांनी वर्तवली आहे. (Gold Smuggling)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.