पोलिसांच्या गाड्यांना GPS सिस्टीम बसवली

या तंत्रज्ञानामुळे पोलिसांची गस्त अधिक प्रभावी होणार आहे. त्याचबरोबर पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातून या वाहनांवर नजर ठेवली जाणार आहे.

80
पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी येथील पोलिसांच्या २०० हुन अधिक वाहनांना GPS सिस्टीम बसवण्यात आली आहे. या यंत्रणा सीआर मोबाईल आणि बीट मार्शलच्या गाड्यांसह पोलिस निरीक्षकांच्या देखील वाहनामध्ये ही सिस्टीम लवकरच बसविण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली आहे.
या तंत्रज्ञानामुळे पोलिसांची गस्त अधिक प्रभावी होणार आहे. त्याचबरोबर पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातून या वाहनांवर नजर ठेवली जाणार आहे. ही प्रणाली GPS संबंधित वाहन सध्या कोठे आहे, त्याची गती किती आहे, कोणत्या ठिकाणी किती वेळ थांबले, त्याला निर्धारित दिलेले पेट्रोलिंगचे पाइंट त्याने तपासले आहेत का, अशी अद्ययावत माहिती नियंत्रण कक्षाला मिळणार आहे. पोलिस नियंत्रण कक्षात उपस्थित असलेल्या विशेष मॉनिटरिंग सॉफ्टवेअरद्वारे GPS हा डेटा अधिकार्‍यांना तत्काळ उपलब्ध होईल. पुणे पोलिसांच्या पेट्रोलिंग वाहनांची कार्यक्षमता आणि जबाबदारी वाढवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामुळे चोरी, दरोडा यांसारख्या घटनांवर तत्काळ कारवाई होऊ शकते. महिला सुरक्षा आणि रात्रीची गस्त अधिक प्रभावी करता येईल.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.