नाशिक येथे ३ वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या छापेमारीत साडेचार लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. यावेळी गुटखा विक्री करणाऱ्या तिघांसह रिक्षाचालक अशा एकूण चार जणांना अटक करण्यात आली.
शहरातील आयशानगर चौक, डीके कॉर्नर आणि सवंदगाव फाटा या तीन वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने हा छापा (raids) टाकण्यात आला. या कारवाईमुळे गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
(हेही वाचा – Lalit patil : ड्रगमाफिया ललित पाटीलचा छडा लावण्यासाठी शिंदे गावात चौकशी, मुंबई पोलिसांचे पथक दाखल)
आयशानगर भागातील मोहम्मद असलम अब्दुल रज्जाक शहा (३४,रा. दरेगाव शिवार) याच्या ताब्यातून अवैध विक्रीसाठी बाळगलेला केसरयुक्त विमल पानमसाला, व्ही-१ असा १ लाख ४९ हजार ३७२ रुपयांचा गुटखा, दीड लाख रुपये किमतीची रिक्षा (एमएच १५ एके ५८२४), असा एकूण २ लाख ९९ हजार ३७२ रुपयांचा गुटखा जप्त केला.
दिनेश संतोष सूर्यवंशी (२३, रा. पारिजात कॉलनी) यांच्या माऊली चौकातील घरात पोलिसांनी छापा टाकून १ लाख ४१ हजार ७०५ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला, तर सवंदगाव विमल पानमसाला, व्ही-१ असा ५ हजार २२५ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
कॅम्प पोलीस ठाण्यात दिनेशविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा गुन्हा पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.