ठाण्यातील (Thane) हजुरी परिसरातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. विनयभंगाची सावज झालेल्या एका हिंदू महिलेच्या शोधात मुसलमानांच्या गटाने मंदिराचे पावित्र्य न राखता चप्पल बुटासह मंदिरात प्रवेश करून गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या संतापजनक घटनेचे पडसाद संपूर्ण ठाण्यात उमटून ठाण्यातील हिंदू संघटनांनी हजुरी भागात धाव घेऊन या घटनेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान मंदिरात प्रवेश करणाऱ्या विरुद्ध मुस्लिम गटावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या वागळे इस्टेट पोलिसांनी इसफाक सिद्धीकी, इसफाक आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावणे, तसेच धमकी देणे, चिथावणी देणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा – ओडिसी साहित्यात नवा प्रवाह निर्माण करणारे ओडिसी कादंबरीकार Kalindi Charan Panigrahi)
काय आहे प्रकरण ?
ठाण्यातील हजुरी परिसरात रहाणारी पीडित हिंदू महिला बाजारात गेली होती. त्याच परिसरातील एक मुस्लिम तरुण या महिलेच्या मागावर होता. बाजारात त्याने पीडित महिलेकडे सुट्ट्या पैशांची मागणी केली असता पीडितेने सुट्टे नसल्याचे सांगितले. ती घराच्या दिशेने निघाली. त्या वेळी मुस्लिम तरुणाने तिचा पाठलाग करत त्याने एका चिंचोळ्या गल्लीत त्याने पीडितेला पाठीमागून मिठी मारली, अचानक झालेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घरी आली. तिने कामावर असलेल्या पतीला फोन करून तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाबाबत कळवले.
‘घरी आल्यावर पोलीस ठाण्यात जाऊ’, असे सांगून पतीने तिला सांगितले.
चप्पल बूट न काढताच गाभाऱ्यात प्रवेश
दरम्यान या महिलेचा शोध घेत एक मुस्लिम गट पीडित महिलेच्या घरी आला. मुसलमानांनी तिला ‘पोलीस ठाण्यात तक्रार केलीस, तर याद राख!’, अशी धमकी दिली. या धमकीला आणि मुस्लिमांचा गट बघून घाबरलेल्या पीडित महिलेने स्वतःचा बचाव करण्यासाठी परिसरात असलेल्या एका मंदिरात आश्रय घेतला. दरम्यान, या पीडित महिलेच्या मदतीसाठी एक हिंदू कुटूंब मंदिरात आले. ते कुटुंब महिलेला आधार देत असताना इसफाक सिद्धीकी, इसफाक हे मुस्लिम गटासह मंदिराकडे आले व त्यांनी ‘पीडित महिलेला आमच्या ताब्यात द्या’, अशी धमकी दिली. चप्पल बूट न काढताच मुसलमान जमावाने मंदिरात आणि गाभाऱ्यात प्रवेश करून पीडितेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू लागले. या वेळी मुसलमानांनी ‘कोई बीच मे आया तो एक एक को काट के रखेंगे’, अशी धमकी मुस्लिम गटाकडून देऊन मंदिरात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पीडित महिलेचा बचाव करणाऱ्या हिंदू कुटुंबासोबत मुस्लिम गट वाद घालून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत होते.
पोलिसांचा गुन्हा नोंदवण्यास नकार; हिंदू संघटनांचा आक्षेप
हा प्रकार सुरू असताना मंदिराबाहेर बघ्याची गर्दी गोळा झाली होती, या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी इसफाक सिद्धीकी, इसफाक सह तीन जणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन गेले. सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता, मात्र दबावानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप हिंदू संघटनाच्या पदाधिकारी यांनी केला आहे. वागळे इस्टेट पोलिसांनी इसफाक सिद्धीकी, इसफाक आणि एका अनोळखी व्यक्ती विरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावणे तसेच धमकी देणे, चिथावणी देणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदू संघटनांनी प्रशासनाकडे नोंदवला आक्षेप
हिंदू संघटनांनी शनिवारी सकाळी ११ वाजता ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन त्यांना या प्रकरणाची माहिती दिली आणि निवेदन सादर केले. संतप्त हिंदूंनी या घटनेचा निषेध करत प्रशासनाकडे आक्षेपही नोंदवला. आरोपींवर कारवाईची मागणी करण्यात आली. तक्रार निवेदनात संतप्त हिंदू संघटांनी म्हटले आहे की, “हाजुरीतील हिंदू रहिवासी अत्यंत असुरक्षित झाले आहेत. अनेक महिन्यांपासून हिंदू महिलांचा छळ केला जात असून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. रविवारी (२३ जून २०२४) शेहजाद शेख याने एका हिंदू महिलेवर तिच्या घरी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. स्वत:ला वाचवण्यासाठी हिंदू महिलेने परिसरातील शिवमंदिरात आसरा घेतला. “ही बातमी समजताच मुस्लिमाचा एक जमाव मंदिराच्या आवारात घुसला आणि हिंदू पीडितेला बाहेर येण्यास सांगितले.”
पीडितेने बाहेर येण्यास नकार दिल्यावर चप्पल घातलेले मुस्लिम जमाव चप्पल बूट घालून मंदिरात घुसले आणि त्यांनी मंदिरात गोंधळ घातला असे तक्रारीत म्हटले आहे. हिंदू कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार या घटनेमुळे हिंदू मंदिराच्या पावित्र्याचा भंग झाला असून हजुरी परिसरात धार्मिक तणाव निर्माण झाला आहे. वेळीच कारवाई न केल्यास हिंदू समाज स्वसंरक्षणासाठी उपाययोजना करेल, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे. याशिवाय पीडितेच्या कुटुंबियांना सुरक्षा देण्याची मागणीही करण्यात आली आहे. (Thane )
हेही पहा –
Join Our WhatsApp Community