-
रमेश शिंदे
प्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ टेंपल ग्रँडिन यांच्या संशोधनानुसार झटका पद्धतीने पशुवध केला तर रक्तातील कॉर्टिसोलची पातळी वाढते आणि त्यानंतर प्राण्यांच्या स्नायूंचे तापमान २६, २७ वाढते. मध्यम पातळीचे एड्रेनालाईन स्राव स्नायू ग्लायकोजेनचे लॅक्टिक अॅसिडमध्ये रूपांतर करते जे मांसाचे पीएच कमी करते. (ते आम्लयुक्त बनवते) यामुळे मांस मऊ आणि ताजे राहते. तसेच हानिकारक जीवाणूंच्या वाढीपासून देखील मांसाचे संरक्षण होते. परंतु हलाल (Halal) पद्धतीने पशुवध केला तर अतिरिक्त रक्त स्रावामुळे स्नायू ग्लायकोजेनचा एकूण साठा लवकर कमी होतो; म्हणूनच, मांस बाजारात येईपर्यंत, त्यात लॅक्टिक अॅसिड शिल्लक राहत नाही, ज्यामुळे उच्च पीएच पातळी निर्माण होते ज्यामुळे मांस आम्लयुक्त बनते आणि त्यात हानिकारक जंतूंची वाढ होते, तसेच मांस शुष्क होते आणि काळवंडते.
धारदार सुरीने एकाच घावात त्या प्राण्याची श्वासनलिका, रक्त वाहून नेणाऱ्या धमन्या आणि गळ्याच्या नसा कापल्या गेल्या पाहिजेत. त्यानंतर त्या पशूचे संपूर्ण रक्त वाहून जाऊ देऊन तो मृत झाला पाहिजे. रक्त ‘हराम’ (निषिद्ध) मानलेले असल्याने ते संपूर्ण वाहून जाऊ देणे हे हलाल (Halal) पद्धतीत आवश्यक मानले जाते. पशूचा गळा कापून तो तडफडत असताना त्याचे संपूर्ण रक्त वाहू देणारी ‘हलाल’ (Halal) पद्धत अमानवी असल्याचे सांगितल्यानंतर त्वरित ‘हलाल’ पद्धतच सर्वांत कमी वेदनादायक असल्याचे सिद्ध झाल्याचा दावा मुसलमानांकडून केला जातो. प्रत्यक्षात या संदर्भात पाश्चात्त्य देशांत संशोधन झालेले असून त्यात हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे.
(हेही वाचा – Haryana : एसी कॉम्प्रेसरचा स्फोट; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, एक जखमी)
वर्ष २००९ मध्ये न्यूझीलंडच्या ‘मॅसी विद्यापिठा’मध्ये संशोधन करणारे क्रेग जॉन्सन यांनी त्यांच्या चमूच्या समवेत या संदर्भात एक प्रयोग केला. त्यातून त्यांनी ‘हलाल (Halal) पद्धतीने गळा कापल्याने पशुला अधिक वेदना सहन कराव्या लागतात’, हे सिद्ध केले आहे. त्यांच्या संशोधनात सिद्ध झाले, ‘हलाल पद्धतीने पशुचा गळा कापल्याने १० ते ३० सेकंदांत तो त्याची चेतना गमावतो; परंतु त्या स्थितीतही गळा कापल्यानंतर २ मिनिटांपर्यंत ‘हलाल’ (Halal) केलेल्या पशूला वेदना सहन कराव्या लागतात.’ यामुळे ‘हलाल’ पद्धत पशुंसाठी क्रूर असल्याचे सिद्ध झाले असून त्यामुळे जगभरात ‘हलाल’ला विरोध होऊ लागला आहे.
सर्व मुसलमान ‘हलाल’ पद्धत सुरक्षित असल्याचा दावा करताना जर्मनीच्या ‘हॅनोवर विद्यापिठा’चे प्रा. विल्हेम शुल्ज यांच्या वर्ष १९७८ मधील संशोधनाचे उदाहरण देतात. प्रा. शुल्ज यांनी या संदर्भात संशोधन करून सांगितले होते, ‘कॅप्टिव्ह बोल्ट पिस्टल’ने (पशुला बेशुद्ध करण्याच्या साधनाने) अचेतन करण्याच्या तुलनेत ‘हलाल’ (Halal) पद्धत अधिक मानवीय आहे’; परंतु वर्ष २००२ मध्ये याच शुल्ज यांनी मृत्यूपूर्वी त्यांच्या ‘हलाल’च्या संदर्भातील संशोधन अहवालापासून सावधान राहण्यास सांगितले होते. ते म्हणाले होते, ‘प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या उपकरणांच्या साहाय्याने केलेल्या ‘हलाल’ची (Halal) तुलना सामान्यतः सार्वजनिकरित्या केल्या जाणाऱ्या ‘हलाल’ (Halal) पद्धतीशी करता येणार नाही. कदाचित प्रयोगाच्या वेळी आम्ही वापरलेली ‘कॅप्टिव्ह बोल्ट पिस्टल’ संशयास्पद होती आणि तिने त्या पशुला अचेतन करण्याचे काम योग्य प्रकारे केले नव्हते.’ प्रत्यक्षात प्रा. विल्हेम शुल्ज यांच्या या फसलेल्या प्रयोगानंतर वर्ष २००९ मध्ये क्रेग जॉन्सन (Craig Johnson) यांनी पुन्हा प्रयोग करून ‘हलाल’ (Halal) पद्धत क्रूर आणि अमानवी असल्याचे सिद्ध केल्यानंतरही मुसलमान वर्ष १९७८ च्या प्रयोगाचा दाखला देऊन ‘हलाल’ पद्धत अल्प वेदनादायक असल्याचे अद्याप सांगतात. यातूनच त्यांचा खोटारडेपणा सिद्ध होतो.
(हेही वाचा – मातोश्रीवरच लवकरच औरंगजेबाचा फोटो लावला जाईल; Sanjay Nirupam यांची टीका)
‘हलाल’ पद्धत अमानवी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर आता युरोपमधील (Europe) डेन्मार्क, नेदरलँड, स्वीडन, स्वित्झर्लंड, लक्समबर्ग, बेल्जियम, इंग्लंड इत्यादी अनेक देशांमध्ये सचेत पशुला ‘हलाल’ (Halal) करण्यावर वर्ष २०१७ मध्ये कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटनमधील शाळांमध्ये ‘हलाल’ (Halal) मांसावर बंदी घालण्यात आली आहे. युरोपमधील या ‘हलाल’ विरोधी कायद्याला मुसलमानांनी न्यायालयात आव्हान दिले; मात्र वर्ष २०२० मध्ये न्यायालयाने या कायद्याचे समर्थन करून ‘हलाल’ पद्धतीने केली जाणारी पशुहत्या बंद करण्याचा आदेश दिला. आता मुसलमानांपुढे कोणताही पर्याय न राहिल्यामुळे त्यांना कायद्यापुढे झुकावे लागले आणि त्यांनी विद्युत झटक्याने पशुला अचेतन केल्यास ते ‘हलाल’ मानण्याचे मान्य केले. आता त्यांनी अचेतन पशुचे मांस ‘हलाल’ (Halal) म्हणून स्वीकारले आहे; मात्र त्यांनी वर्षातून २ वेळा त्यांच्या धार्मिक सणांच्या दिवशी इस्लामी पद्धतीने ‘हलाल’ (Halal) करण्याची अनुमती स्थानिक शासनाकडे मागितलेली आहे. युरोपातील देशांत ‘हलाल’ पद्धतीवर बंदी घातली गेली; मात्र भारतातील ‘पशू क्रूरता निवारण अधिनियम, १९६०’ या कायद्यात धार्मिक कारणांसाठी केलेल्या पशुहत्येतील क्रूरतेला संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या कायद्यातील ‘संकीर्ण’ भागातील या क्रूरतेला संरक्षण देणारे सूत्र क्र. २८ हे वगळले जाण्यासाठी पशुप्रेमी संघटनांनी एकत्र येऊन ‘हलाल’ (Halal) पद्धतीच्या अमानवीयतेच्या विरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे.
(लेखक हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community