मुंबईच्या बोरिवली इथे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला (Sanjay Gandhi National Park) तळीरामांनी आग (Fire) लावली आहे. दारूच्या नशेत त्यांनी चक्क जंगलात आग लावली. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाली आहे. होळी असल्याने मोठ्या संख्येमध्ये तळीराम संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जंगलाजवळा असलेला दहिसर (Dahisar) परिसरात गेले होते. तिथे त्यांच्या पार्ट्या सुरू होत्या. अचानक रात्री सहाच्या सुमारास जंगलामध्ये मोठ्या आगीचे लोट दिसले. (Sanjay Gandhi National Park)
हेही वाचा-UP : देशाची गोपनीय माहिती पाकिस्तानी एजंटला देणाऱ्या शस्त्रनिर्मिती कारखान्यातील कर्मचाऱ्याला अटक
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा चार ते पाच गाड्या आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मधले सुरक्षारक्षक घटनास्थळी दाखल झाले. सुमारे 1 ते दीड तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र या आगीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचा अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झालं आहे. तर ही आग कोणी लावली? या संदर्भात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे सुरक्षारक्षक आणि पोलीस तपास करत आहेत. (Sanjay Gandhi National Park)
हेही वाचा-Holi 2025 : ऐन सणासुदीच्या दिवशी महाराष्ट्रात आठ जणांचा बुडून मृत्यू !
वनवा लागण्याची घटना ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या रावलपाडा नियत क्षेत्रातील सर्वे नं. 345ब मधील असून संध्याकाळी 7 च्या सुमारास लागलेली आग ही ८ वाजता कु. उ. बो. वनक्षेत्र अधिकरी, वन कर्मचारी आणि Rapid Response Team च्या प्रयत्नाने पूर्णपणे विझवण्यात आली. (Sanjay Gandhi National Park)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community