Hamas : भारतातही हमासचा शिरकाव ?; जमात-ए-इस्लामीच्या रॅलीत हमासच्या माजी प्रमुखाचे भाषण

केरळमध्ये देशविरोधी भूमिका घेऊन उघडपणे जिहादी दहशतवाद्यांची भूमिका घेतली गेल्यामुळे राष्ट्रप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:30 वाजता हमासचा माजी प्रमुख खालिद माशेल याचे जमात-ए-इस्लामीच्या या कार्यक्रमात हे देशविरोधी भाषण झाले.

180
Hamas : भारतातही हमासचा शिरकाव ?; जमात-ए-इस्लामीच्या रॅलीत हमासच्या माजी प्रमुखाचे भाषण
Hamas : भारतातही हमासचा शिरकाव ?; जमात-ए-इस्लामीच्या रॅलीत हमासच्या माजी प्रमुखाचे भाषण

केरळमधील मलप्पुरम येथे दहशतवादाच्या समर्थनासाठी रॅली काढण्यात आली. (Hamas) मलप्पुरममध्ये जमात-ए-इस्लामी हिंद या संघटनेने काढलेल्या या रॅलीत हमास या दहशतवादी संघटनेचा नेता  खालिद माशेल याने संगणकीय माध्यमातून भाषण केले. हमासच्या हल्ल्यांमुळे इस्रायलमधील जनतेने अनेक अत्याचार सहन केले. भारत सरकारनेही इस्रायलच्या बाजूने भूमिका मांडताना हमासच्या हल्ल्याला दहशतवादी हल्ला असे म्हटले आहे. असे असूनही केरळमध्ये देशविरोधी भूमिका घेऊन उघडपणे जिहादी दहशतवाद्यांची भूमिका घेतली गेल्यामुळे राष्ट्रप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:30 वाजता हमासचा माजी प्रमुख खालिद माशेल याचे जमात-ए-इस्लामीच्या या कार्यक्रमात हे देशविरोधी भाषण झाले. (Hamas)

(हेही वाचा – Pushkar Shrotri : अभिनेते पुष्कर श्रोत्री यांच्या घरात चोरी; मोलकरणीसह दोन जणांना अटक)

हमास या दहशतवादी संघटनेचा नेता खालिद माशेल याने ‘सेव्ह पॅलेस्टाईन’ या नावाने जमात-ए-इस्लामी हिंदच्या रॅलीसमोर भाषण केले. या रॅलीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हमासचा माजी प्रमुख खालिद माशेल याने हिंदु धर्म, यहुदी पंथ उखडून टाकण्याची चिथावणीखोर भाषा केली आहे.  (Hamas)

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनीही या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे. ‘पिनाराई विजयन यांचे केरळ पोलीस कुठे आहेत ? पॅलेस्टाईन वाचवण्याच्या नावाखाली दहशतवादी संघटना हमास आणि तिच्या नेत्यांचा योद्धा म्हणून गौरव केला जात आहे, जो कोणत्याही प्रकारे स्वीकारार्ह नाही. अशा कार्यक्रमाला परवानगी का दिली गेली, असा प्रश्न के. सुरेंद्रन यांनी एक्स (ट्विटर) वर विचारला आहे.

याच केरळ राज्यात तुर्कस्थानच्या खलिफाला समर्थन देण्यासाठी मोपल्यांचे बंड झाले होते आणि हिंदूची कत्तल झाली होती.  पीएफआय या जिहादी आणि देशविरोधी कारवाया करणाऱ्या संघटनेनेही केरळमध्येच उच्छाद घातला होता. मल्लपूरम येथून मोठ्या प्रमाणात सोने तस्करी होत असते. जिहादी, देशविरोधी आणि हिंसक कारवाया होत असताना केरळचे साम्यवादी सरकार याकडे कानाडोळा करते. त्यामुळे या घटनेनंतर पिनराई विजयन यांच्या सरकारविषयीही संताप व्यक्त केला जात आहे.  (Hamas)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.