हरियाणा सरकारने धर्मांतर विरोधी कायदा केला आणि त्या अंतर्गत पहिला गुन्हा मुसलमान कुटुंबाच्या विरोधात दाखल करण्यात आला. या कुटुंबाने जबरदस्तीने २२ वर्षीय हिंदू तरुणीचे मुसलमान धर्मात धर्मांतर केले. मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी ही कारवाई केली.
हिंदू तरुणीच्या वडिलांनी काय तक्रार केली?
मार्चमध्ये हरियाणा विधानसभेने ‘हरियाणा बेकायदेशीर धर्मांतरण प्रतिबंधक विधेयक, २०२२’ मंजूर केले होते. हा कायदा पारित केल्यानंतर पहिल्यांदाच या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. एखाद्या व्यक्तीचे सक्तीने, दबाव टाकून किंवा प्रलोभने देऊन होणारं धर्मांतरण रोखणे, हे या कायद्याचे उद्दिष्ट आहे. मंत्रिमंडळाने हा कायदा लागू करण्यास मंजुरी दिली. तक्रारदाराच्या मुलीने नुकतेच दुसर्या धर्मातील एका तरुणाशी लग्न केले. तरुणाच्या कुटुंबाने जबरदस्तीने आणि बेकायदेशीरपणे आपल्या मुलीचे धर्मांतर केल्याचा आरोप तरुणीच्या वडिलांनी केला. पोलीस तक्रारीत तरुणीच्या वडिलांनी आरोप केला की, मी हिंदू धर्माचा अनुयायी आहे. माझ्या मुलीला एका मुस्लीम व्यक्तीने आमिष दाखवून लग्न केले. एका वर्षापूर्वी आरोपी तरुण, त्याचा भाऊ आणि त्याचे आई-वडील माझ्या मुलीसाठी लग्नाचा प्रस्ताव घेऊन घरी आले होते. मी त्यांना लग्नासाठी नकार दिला. आम्ही हिंदू आहोत आणि तिला मुस्लिमांशी लग्न करू देणार नाही, असे मी त्यांना सांगितले. पण तुमच्या परवानगीची आम्हाला गरज नाही, असे सांगून ते निघून गेले. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी तिचे धर्मांतर करत मुस्लीम तरुणाशी लग्न लावण्यात आल्याचे समजले, असे तक्रारदाराने सांगितले.
Join Our WhatsApp Community