मुंबईत शूटिंगसाठी आलेल्या हरियाणातील १९ वर्षीय अभिनेत्रीवर मरीन ड्राईव्ह येथील एका हॉटेलच्या खोलीत बलात्कार झाल्याची घटना बुधवारी समोर आली आहे. बलात्कार करणारा इसम हा या अभिनेत्रीचा मित्र असून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेने मुंबईत खळबळ उडवून दिली आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी हा ३८ वर्षांचा असून पीडित अभिनेत्रीचा मित्र आहे. १९ वर्षीय पीडित अभिनेत्री ही हरियाणा राज्यातील असून तेथील अनेक चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. मुंबईत एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी काही दिवसांपूर्वी आली होती. तिच्यासोबत तिचा ३८ वर्षाचा मित्र होता, या दोघांनी मरीन ड्राईव्ह येथील एका बड्या हॉटेलमध्ये खोली बुक केली होती.
(हेही वाचा – डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांसह तीन पोलीस निलंबित)
या दरम्यान हॉटेलच्या खोलीत अभिनेत्रीला एकटी बघून मित्राने तिच्याकडे लैंगिक सुखाची मागणी केली. परंतु तिने ती मागणी फेटाळून लावल्यानंतर त्याने बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून याची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारू अशी धमकी त्याने या अभिनेत्रीला दिली होती. बुधवारी या अभिनेत्रीने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात मित्राविरुद्ध तक्रार दाखल केली. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी बलात्कार, धमकी देणे याप्रकरणी गुन्हा दाखल करून मित्राला अटक केली असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे आधिकरी यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community