Hathras Stampede: हाथरस प्रकरणी भोलेबाबांची प्रतिक्रिया; भोलेबाबांनी आता काय म्हटलं ?

185
Hathras Stampede: हाथरस प्रकरणी भोलेबाबांची प्रतिक्रिया; भोलेबाबांनी आता काय म्हटलं ?
Hathras Stampede: हाथरस प्रकरणी भोलेबाबांची प्रतिक्रिया; भोलेबाबांनी आता काय म्हटलं ?

उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये (Hathras Stampede) भोले बाबांचा सत्संग आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी सत्संग झाल्यानंतर जेव्हा भोले बाबा (Bhole Baba) निघाले तेव्हा चेंगराचेंगरी झाली. १२१ भाविकांचा यात मृत्यू झाला. अनेक जखमी झाले. या प्रकरणात कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य सेवेकरी देवप्रकाश मधुकर व इतरांची नावे यामध्ये आहेत. दरम्यान, हाथरस दुर्घटनेनंतर भोले बाबा पहिल्यांदाच समोर आला आहे.

काय म्हणाले भोले बाबा?

“२ जुलैला जी घटना घडली त्यानंतर मी खूप व्यथित झालो आहे. देव आम्हाला या धक्क्यातून सावरण्याची शक्ती देओ. आम्हाला प्रशासन आणि शासनावर विश्वास आहे. जे समाजकंटक आहेत त्यांना शिक्षा होईल, कुणालाही सरकार सोडणार नाही. आमचे वकील डॉक्टर ए.पी. सिंग यांच्या माध्यमातून कमिटीच्या माध्यमातून या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहोत. तसंच सगळ्या महापुरुषांना मी विनंती केली आहे की, या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबांना आपल्याला साथ द्यायची आहे. सर्वतोपरी सहकार्य करायचं आहे. माझी विनंती सगळ्यांनीच मान्य केली आहे. देव सगळ्यांना सद्बुद्धी देईल. जी घटना घडली त्याचं मला अतीव दुःख झालं आहे. माझ्या संवेदना मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसह कायम आहेत, तसंच जे जखमी झाले त्यांनाही आराम पडावा अशी मी प्रार्थना करतो.” (Hathras Stampede)

पोलिसांसमोर आत्मसमर्पण

हाथरस अपघातातील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याला अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील नजफगढ-उत्तम नगर दरम्यानच्या रुग्णालयात त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. खुद्द भोले बाबाच्या वकिलाने याला दुजोरा दिला आहे. यूपी पोलिसांनी त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. (Hathras Stampede)

निष्काळजीपणा आणि गलथान कारभारामुळे

त्याचवेळी भोले बाबाच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. निष्काळजीपणा आणि गलथान कारभारामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात आले. परिस्थितीचे आकलन करण्यात अधिकारी अपयशी ठरले. जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसह १९ जणांचे जबाब घेण्यात आले आहेत. आतापर्यंत मिळालेले पुरावे आयोजक दोषी असल्याचे सिद्ध करतात. (Hathras Stampede)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.