Hathras Stampede: हाथरस चेंगराचेंगरीवर भोले बाबांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

151
Hathras Stampede: हाथरस चेंगराचेंगरीवर भोले बाबांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Hathras Stampede: हाथरस चेंगराचेंगरीवर भोले बाबांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

उत्तर प्रदेशातल्या हाथरस (Hathras Stampede) या ठिकाणी भोलेबाबांचा सत्संग आयोजित करण्यात आला होता. या सत्संगात चेंगराचेंगरी झाली. त्यात १२१ जणांचा बळी गेला आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. आता या सगळ्या प्रकरणावर भोलेबाबा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. जे काही घडलं त्याचा मला खेद वाटतो आहे, असं भोलेबाबांनी म्हटलं आहे.

भोले बाबांनी नेमकं काय म्हटलं आहे?

“या कार्यक्रमात अपेक्षेपेक्षा हजारो लोक आले होते. भोले बाबांनी सत्संगस्थळ सोडल्यानंतर त्यांचा स्पर्श झालेली माती गोळा करण्याकरता गर्दी जमली. त्यासाठी लोक जमिनीवर पसरले होते. यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत भाविक जवळच्या नाल्यात पडले. मी चेंगराचेंगरी होण्याआधीच तिथून निघालो होतो. चेंगराचेंगरीत ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांना मी आदरांजली वाहतो. तसंच जे जखमी झाले आहेत त्यांना देव लवकर बरं करो अशी प्रार्थना करतो. मी या प्रकरणासाठी वरिष्ठ वकील डॉ. ए.पी. सिंह यांना कारवाई करण्याची विनंती केली आहे. कारण काही समाजकंटकांमुळे चेंगराचेंगरी झाली.” असं भोलेबाबांनी म्हटलं आहे. (Hathras Stampede)

FIR मध्ये काय म्हटलं आहे?

FIR मध्ये दिलेल्या माहितीनुसार चेंगराचेंगरी झाली त्याआधीच भोलेबाबा (bholebaba) निघत होते. दुपारी दोन वाजता हाथरस येथील सत्संगाच्या ठिकाणी भोलेबाबांच्या अनुयायांची मोठी गर्दी झाली. त्यानंतर एकच हलकल्लोळ माजला. FIR मध्ये हेदेखील नमूद करण्यात आलं आहे की लोक नाल्यात पडले आणि त्यानंतर चेंगराचेंगरी वाढली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १२१ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. जे लोक जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Hathras Stampede)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.