‘जाणीवपूर्वक तपासास विलंब करत आहात का?’ Akshay Shinde encounter प्रकरणी हायकोर्टाचा CID ला सवाल

43
'जाणीवपूर्वक तपासास विलंब करत आहात का?' Akshay Shinde encounter प्रकरणी हायकोर्टाचा CID ला सवाल
'जाणीवपूर्वक तपासास विलंब करत आहात का?' Akshay Shinde encounter प्रकरणी हायकोर्टाचा CID ला सवाल

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित एन्काऊंटर प्रकरणाच्या (Akshay Shinde encounter) तपासाबाबत सीआयडी (CID) गंभीर नाही. जाणीवपूर्वक तपासास विलंब करत आहात का? असा सवालच मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) सीआयडीला केला आहे. तसेच 20 जानेवारीपर्यंत न्यायालयीन चौकशीकरता पोलीस तपासाची सगळी कागदपत्रे जमा करण्याचे सीआयडीला निर्देश देण्यात आले. अक्षय शिंदेच्या वडिलांनी एन्काऊंटर बनावट असल्याचा आरोप करत हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवरील पुढील सुनावणी 20 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. (Akshay Shinde encounter)

पुढील सुनावणी 20 जानेवारी 2025
इतके दिवस झाले तरी राज्य सरकार तपासाबाबत गंभीर दिसत नाही अस उच्च न्यायालयाने म्हटलं. तुमच्याकडून काय अपेक्षा होती, आणि तुम्ही काय करताय? अशा शब्दात उच्च न्यायालयाने सीआयडीला फटकारलं. त्यावर या प्रकरणात अजूनही साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचीच प्रक्रिया सुरू असल्याची सीआयडीकडून कोर्टात माहिती देण्यात आली. (Akshay Shinde encounter)

उच्च न्यायालयाने सांगितले की, “चांगल्या तपासासाठी, स्थानिक पोलिसांकडून प्रकरणे घेतली जातात आणि सीआयडीकडे दिली जातात. सर्व कागदपत्रे गोळा करून योग्य तपासासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सोपवली जावीत असा त्यांचा प्रयत्न असतो. प्रत्येक बाबतीत निष्पक्षता असली पाहिजे. येथेही तपासाचा अधिकार आरोपी आणि त्याच्या कुटुंबियांना आहे.” त्यानंतर सर्व कागदपत्रे आणि माहिती दंडाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली असून ते एका आठवड्यात सुपूर्द करण्यात येतील, असे खंडपीठाला सांगण्यात आले. (Akshay Shinde encounter)

संयमाची परीक्षा पाहू नका!
तुमच्या कार्यपद्धतीमुळेच तुमच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तुम्ही नेमका काय तपास केला? तुम्हाला वारंवार मुदत देऊनही वैद्यकीय कागदपत्रे का गोळा केली नाही? तुम्ही जाणीवपूर्वक त्यास विलंब करीत आहात का? आता आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका, अशा शब्दांत खंडपीठाने सीआयडीची कानउघाडणी केली. (Akshay Shinde encounter)

पीडित मुलीचे कुटुंब उच्च न्यायालयात धाव घेणार …
बदलापुरातील शाळेत घडलेल्या चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या दोघांनाही एक महिन्यानंतर पोलिसांनी कर्जत परिसरातून बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर या दोघांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला. तसेच या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांनादेखील 25 हजारांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला. बदलापूर अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी शाळेच्या ट्रस्टीला जामीन मिळाल्यामुळे पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती दिली. याबाबत पीडित मुलीच्या आईने उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. (Akshay Shinde encounter)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.