मुंबईत उच्चभ्रू Sex Racket उद्ध्वस्त; हिंदी मालिकेतील ४ अभिनेत्रींची सुटका, एकाला अटक

158
मुंबईत उच्चभ्रू Sex Racket उद्ध्वस्त; हिंदी मालिकेतील ४ अभिनेत्रींची सुटका, एकाला अटक
  • प्रतिनिधी

मुंबई पोलिसांनी हिंदी चित्रपटसृष्टी आणि मॉडेलिंग क्षेत्रात सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पर्दाफाश केला आहे. १ लाख रुपयांपासून ते ५ लाखांपर्यंत स्वतःचा सौदा करणाऱ्या हिंदी टीव्ही मालिकांमधील ४ अभिनेत्रींची या सेक्स रॅकेटमधून सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी ६० वर्षांचा दलाल श्यामसुंदर अरोरा याला अटक केली आहे. पवई पोलिसांनी हिरानंदानी परिसरातील एका हॉटेलमध्ये ही कारवाई करून ऑनलाईन पद्धतीने सुरू असणाऱ्या उच्चभ्रू सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी येथील आंबोली परिसरात राहणारा श्यामसुंदर अरोरा हा ऑनलाइन हायप्रोफाइल सेक्स रॅकेट (Sex Racket) चालवत असल्याची माहिती पवई पोलिसांना मिळाली होती. श्यामसुंदर अरोरा आणि त्याचे इतर दलाल साथीदारांच्या संपर्कात हिंदी सिनेमासृष्टीतील अनेक नट्या आणि मॉडेल आहेत. पवई पोलिसांनी बोगस ग्राहक तयार करून श्यामसुंदर अरोरा याला संपर्क साधला. बोगस ग्राहकाच्या मागणीनुसार अरोरा याने बोगस ग्राहकाला काही तरुणींची छायाचित्रे व्हॉट्सअॅपवर पाठवली होती. प्रत्येक तरुणीचे दर पत्रक (रेट कार्ड) पाठवले होते. हा सर्व प्रकार केवळ व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सुरू होता. दलालाने ग्राहकाला पवई येथील एका हॉटेलमध्ये खोली बुक करण्यास सांगण्यात आले.

(हेही वाचा – Repo Rate : २०२५ मध्ये एकूण ७५ अंशांनी रेपोदर कपातीची शक्यता)

होळीच्या दिवशी दलाल श्यामसुंदर हा चार तरुणींसोबत या हॉटेलवर आला. दरम्यान पवई पोलिसांनी सापळा लावून श्यामसुंदर अरोरा याला बोगस ग्राहकासोबत आर्थिक व्यवहार करताना ताब्यात घेतले. त्याच्यासोबत असलेल्या चारही तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता या चौघी हिंदी टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्री असून त्या मूळच्या दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश येथे राहणाऱ्या आहेत. मुंबईतील अंधेरी, आंबोली येथे उच्चभ्रू सोसायटीत भाडेतत्वावर राहण्यास आहे. (Sex Racket)

टीव्ही सिरीयलमध्ये मिळणाऱ्या मानधनातून खर्च भागत नसल्यामुळे तसेच स्वतःला या क्षेत्रात टिकून ठेवण्यासाठी इच्छा नसताना केवळ पैशांसाठी त्यांना हा मार्ग पत्करावा लागत असल्याचे त्यांच्या चौकशीत समोर आले. दलाल श्यामसुंदर हा बडे व्यापारी, व्यावसायिकांना एक रात्रीच्या शय्यासोबतीसाठी मॉडेलिंग क्षेत्रातील तरुणी तसेच हिंदी मालिकांमध्ये छोटे-मोठे काम करणाऱ्या तरुणींना १ लाख ते ५ लाख रुपयांमध्ये पुरवत होता. या रकमेतील ५० टक्के रक्कम अरोरा हा स्वतःकडे ठेवत होता अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. पवई पोलिसांनी ४ अभिनेत्रींची या रॅकेट (Sex Racket) मधून सुटका करून त्यांची रवानगी मानखुर्द येथील महिला सुधारगृह येथे करण्यात आली आहे. श्यामसुंदर अरोराविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.