-
प्रतिनिधी
उपनगरात मध्यरात्री आणि पहाटे कधी घोडागाडी तर कधी मोटारसायकलची रेसिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ही केवळ रेसिंग नसून या रेसिंगवर कोट्यवधी रुपयांचा जुगार लावला जातो. या रेसिंगमुळे मात्र इतर वाहन चालक आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत आहे. पूर्व उपनगरातील पूर्व द्रुतगती महामार्गावर पोलिसांनी घोडागाडीच्या रेसिंगवर कारवाई केली होती. (Highway Racing)
मुंबई पोलिसांनी रविवारी राबविण्यात आलेल्या एका विशेष मोहिमेत, वांद्रे आणि खेरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेक्लॅमेशन आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (WEH) येथे रेसिंग आणि स्टंट केल्याच्या आरोपाखाली ५२ बाईकस्वारांवर गुन्हा दाखल केला आणि त्यांच्या बाईक जप्त केल्या. खेरवाडी जंक्शन ते रेक्लॅमेशन पर्यंत झालेल्या या कारवाईत धोकादायकपणे वाहन चालवणाऱ्या बेपर्वा दुचाकीस्वारांना लक्ष्य करण्यात आले. (Highway Racing)
(हेही वाचा – Mahakumbh मध्ये आणखी एक विक्रम ; आतापर्यंत प्रयागराज विमानतळावर उतरली ६५० चार्टर्ड विमाने)
रविवारी पहाटे, मुख्य नियंत्रण कक्षाला वांद्रे रिक्लेमेशन, माउंट मेरी रोड आणि खेरवाडी येथील WEH येथे मोटारसायकल शर्यती सुरू असल्याबद्दल अनेक कॉल आले. नियंत्रण कक्षाने तात्काळ संबंधित पोलिस ठाण्यांना कळवले. त्यानंतर, वांद्रे पोलिस आणि खेरवाडी पोलिसांनी विशेष मोहिमेचे नियोजन केले, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या मोहिमेदरम्यान, पोलिसांनी ५२ बाईकस्वारांकडून एकूण ५२ मोटारसायकली जप्त केल्या. (Highway Racing)
वांद्रे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २८१ (अविचारीपणे किंवा निष्काळजीपणे वाहन चालवणे, मानवी जीवन धोक्यात आणणे), १२५ (इतरांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणे) आणि मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १८४ (धोकादायक वाहन चालवणे) अंतर्गत १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खेरवाडी पोलिस ठाण्यात याच कलमांखाली ३८ जणां विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शर्यतींबद्दल माहिती मिळताच आम्ही कारवाई केली,असे वांद्रे पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. “आम्ही बाईक जप्त केल्या आहेत आणि बाईकस्वारांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात उपस्थित राहण्याची नोटीस पाठवली आहे.” (Highway Racing)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community