Kharghar Ijtema नंतर धर्मांधांनी केली हिंदूची हत्या; बजरंग दलाने दिली कारवाईची चेतावणी

Kharghar Ijtema : यापुढे कार्यक्रम झाल्यास विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आपापल्या पद्धतीने धडा शिकवणार

68
Kharghar Ijtema नंतर धर्मांधांनी केली हिंदूची हत्या; बजरंग दलाने दिली कारवाईची चेतावणी

खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर झालेल्या इज्तेमानंतर (Kharghar Ijtema) रेल्वे स्थानकात झालेल्या प्रचंड गर्दीचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर तेथून परतणाऱ्या धर्मांध युवकांनी २ फेब्रुवारीच्या रात्री उत्सव चौकाजवळ हिंदूची हत्या केली. दुचाकीवरून जाणाऱ्या २ मुसलमान तरुणांनी वाहनाला ओव्हरटेक केल्याच्या आरोपाखाली हेल्मेटने वार करून शर्मा यांची हत्या केली. ४५ वर्षीय शर्मा हे वाशीचे रहिवासी होते. या प्रकरणी विश्व हिंदू परिषद (Vishwa Hindu Parishad) आणि बजरंग दलाने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली.

(हेही वाचा – हिंदुत्ववादी वैभव राऊत मराठा मोर्चात बॉम्बस्फोट करणार होता, असे वक्तव्य केल्याप्रकरणी Jitendra Awhad यांच्यावर गुन्हा दाखल करा; ठाणे न्यायालयाचा आदेश)

याविषयी माध्यमांशी बोलतांना बजरंग दलाचे (Bajrang Dal) सहसंयोजक शंकर संगपाळ यांनी इज्तेमा भरवणाऱ्या मौलवींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शंकर संगपाळ म्हणाले की, तपास उच्च स्तरावर केला पाहिजे. आरोपींना अटक करून कडक कारवाई केली पाहिजे. आम्ही ही बाब मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्तांना लक्षात आणून देणार आहोत. यापुढे इज्तेमासारखा मौलवींचा कोणताही कार्यक्रम नवी मुंबईत होऊ देऊ नये, अशी विनंती आम्ही त्यांना करणार आहोत. यापुढे नवी मुंबईत कार्यक्रम झाल्यास विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आपापल्या पद्धतीने धडा शिकवणार, असा इशारा संगपाळ यांनी दिला आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेत ढिसाळपणा ?

शंकर संगपाळ पुढे म्हणाले की, १ महिन्यापूर्वी खारघरमध्ये इस्कॉनचा कार्यक्रम झाला. त्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही खारघरमध्ये आले होते. असे असूनही १ महिना आधी हेलिपॅडचा ताबा तबलिगींना दिला गेला. पंतप्रधान स्वतः खारघरमध्ये येणार असूनही हेलिपॅडचा ताबा तबलिगींना देणाऱ्या सिडकोच्या अधिकाऱ्याची चौकशी केली गेली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. (Kharghar Ijtema)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.