मालाड (Malad) पूर्व कुरार व्हिलेज येथे गुढीपाडवा या हिंदू सणाच्या दिवशी मुस्लिम समुदायाने चार ते पाच हिंदू तरुणांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोमवारी सामाजिक माध्यमांवर (Social Media) व्हायरल झाला. त्यामुळे संपूर्ण मालाड परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. सध्या येथे तणावपूर्ण शांतता असून कायदा आणि सुव्यवस्था (Law and order) प्रश्न निर्माण होऊ नये; म्हणून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या प्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात अर्शान शेखसह चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्शान शेखला (Arshan Shaikh) अटक करण्यात आली आहे.
(हेही वाचा – RBI Monetary Policy : यंदा पतधोरणात रेपो दर कमी करणे अनिवार्य का आहे?)
कुरार व्हिलेज पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील तक्रारदार राजकुमार चौबे (वय ३७ वर्षे) हा साकीनाका येथील रहिवासी आहे. तो मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय करतो. ३० मार्च या दिवशी तो त्याचा मेहुणा अंकित चौबे याच्यासोबत गुढीपाडव्यानिमित्त (Gudi Padwa) मालाड पूर्वेकडील पिंपरीपाडा येथील रहिवासी सुजित बोस याने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होता. वाटेत त्याच्या सोबत काही इतर मित्रही आले. चौबेला रस्ता माहीत असल्याने तो सर्वांत पुढे होता. संध्याकाळी ५.३० वाजता तो मालाड पूर्वेकडील राणी सती मार्गावर पोहोचला. त्या वेळी त्याच्या कानावर शब्द पडले की, “भगवाधारी इधर आ रहे है, सब को मारो आज इन्हे छोडो मत” घाबरलेला चौबे मालाड पूर्वेकडील पठाणवाडी येथे गेले, जिथे त्यांना ऑटोरिक्षात बसलेल्या त्याच्या मित्रांवर सुमारे दहा अज्ञात लोक हल्ला करताना दिसले.
चौबे यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एका तरुणाने त्यांना शिवीगाळ केली. मारहाण केली आणि म्हटले, “तुम्ही लोक या गर्दीत का आलात ?” हल्लेखोरांनी पांढरे कुर्ते आणि जाळीदार टोप्या घातलेल्या असल्याचे चौबे याने जबाबात म्हटले आहे. चौबे यांच्या ओळखीचे सुजित शर्मा यांनी तातडीने जवळच उभ्या असलेल्या पोलीस व्हॅनकडे धाव घेतली आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि चौबे आणि त्यांच्या मित्रांपासून हल्लेखोरांना वेगळे करण्यात यश मिळवले. त्यानंतर, चौबे यांना पोलीस व्हॅनमध्ये उपचारांसाठी जोगेश्वरी पूर्वेकडील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या घटनेनंतर कुरार व्हिलेज, पठाण वाडी परिसरात हिंदूंना मारहाण करण्यात आल्याची अफवा पसरताच तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान मारहाणीचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल करण्यात आल्यानंतर येथील वातावरण अधिकच तणावग्रस्त झाले होते. पोलिसांनी तात्काळ पोलीस बंदोबस्तात वाढ करून हल्लेखोरांपैकी अर्शान शेखला अटक केली. या प्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात अर्शान शेखसह चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अर्शान शेखला अटक करण्यात आली आहे. (Malad)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community